देशात पुन्हा एकदा कोरोनाचे(Corona) रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. गेल्या 24 तासांत तब्बल 19,893 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य (Health) यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे. देशात आता कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 4,40,87,037 कोटींवर पोहोचला आहे. तर सध्या देशात 1,36,478 एवढे कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 53 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा हा 5,26,530 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली असून, रिकव्हरी रेट हा 98.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात कोरोनाच्या लसीकरणाला वेग आल्याने कोरोना रुग्णांच्या प्रमाणात बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 1932 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 80,52,103 वर पोहोचला आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण 1,48,117 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत बुधवारी एकूण 434 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मध्ये प्रदेश सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 1886 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये एकूण 2,073 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
लस हेच कोरोना अटोक्यात आणण्याचे एकमात्र साधन असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबवला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत देभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. कोरोना लसीकरणामुळे कोरोनाची साथ नियंत्रणात येऊन निर्बंध उठल्याने पुन्हा एकदा अर्थचक्राला चालना मिळाली आहे.