देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या लाटेचा शिरकाव होवुन संक्रमीत रुग्ण (Infected patients) झपाट्याने वाढू लागले आहेत. आता भारतात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 91,779 झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही कोरोनाची लागण झालीच, तर तुम्ही स्वत:ला वेगळे ठेवण्यासोबतच तुमच्या आहाराचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत (Immunity) असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर तुम्ही कोणत्याही संसर्गाशी लढू शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल जेणेकरून तुम्ही लवकर बरे व्हाल. जर तुम्हाला, कोविड 19 चा संसर्ग झाला तर, त्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी आहाराची विशेष काळजी (Special dietary care) घेणे तितकेच गरजेचे आहे. या काळात काय खावे आणि काय खाऊ नये यासाबाबत तुम्हाला माहिती असनेही तितकेच महत्वाचे आहे.
राज्यात सोमवारी 2 हजार 369 नव्या कोरोना रुग्णांची (Corona Patient) नोंद झालीय. तर दिवसभरात 1 हजार 402 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (Mumbai) आढळून आलेत. आज मुंबईत एकूण 1 हजार 62 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधित रुग्णांनी आज आपला जीव गमावलाय. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.85 टक्क्यांवर गेला आहे.
राज्यात सोमवारपर्यंत एकूण 25 हजार 570 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यात एकट्या मुंबईत 12 हजार 479 तर ठाण्यात 5 हजार 871 रुग्ण आहेत. एकूण आकडेवारी पाहिली राज्यात आतापर्यंत 77,91,555 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 97.83 इतकं आहे.