मुंबई : लिव्हर हे आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं देखील तितकच गरजेचं आहे. कारण लिव्हर हे आपल्या शरीराच्या इतर भागांना आधार देण्याचे काम करत असते. पण लिव्हर जेव्हाही योग्यरीत्या काम करत नाही तेव्हा अनेक आजार निर्माण होण्याची शक्यता असते. जसे की शरीरात पित्त रस वाढू शकतो किंवा काही गंभीर आजार निर्माण होऊ शकतात, हानिकारक पदार्थ शरीरात जमा होतात अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातील आणखीन एक समस्या म्हणजे आपल्या पोटात पाणी भरणे, ज्याला जलोदर असं म्हणतात.
लिव्हरची संबंधित समस्यांमुळे आपल्या पोटात पाणी साचून राहते याला जलोदर असे म्हणतात. पोटात पाणी साचल्यामुळे रुग्णाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याला चालणं देखील कठीण होऊन जातं. तसंच लिव्हर जेव्हा त्याचे कार्य करणे थांबवते तेव्हा पोटात पाणी साठण्याची समस्या उद्भवते. तर जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात किंवा ज्यांना कावीळ झाली आहे अशा लोकांना ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते.
लिव्हर मधील जलोदर हा आजार टाळायचा असेल तर योग्य आहार घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यामुळे तुमचे लिव्हर निरोगी राहण्यास मदत होईल. तसेच तुम्हाला काविळीचा त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे आणि योग्य तो उपचार घ्यावा. कारण तुम्ही वेळीच उपचार नाही घेतला तर हिपेटायटिसची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच मद्यपान करणे देखील टाळावे जेणेकरून या गंभीर आजाराचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही.
जर तुमच्या शरीरात जलोदराशी संबंधित काही लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य तो उपचार घ्यावा. कारण तुमच्या पोटात पाणी साचल्यामुळे ते पाणी तुमच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकते, त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास देखील त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे.