3 वर्ष दिल्लीसारख्या शहरात रहा, कँसर घेऊन जा, 73% गॅरेंटी! नव्या अहवालात धक्कादायक दावा

| Updated on: Apr 10, 2023 | 1:51 PM

देशात सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये राजधानी दिल्लीचा समावेश आहे. सलग तीन वर्षे दिल्लीसारख्या शहरात राहिलात तर तुम्हाला कँसरचा धोका होण्याची शक्यता ७३ टक्क्यांपर्यंत असते, असं नव्या संशोधनात सिद्ध झालंय.

3 वर्ष दिल्लीसारख्या शहरात रहा, कँसर घेऊन जा, 73% गॅरेंटी! नव्या अहवालात धक्कादायक दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) गेल्या काही वर्षांपासून अत्यंत प्रदुषित शहर म्हणून ओळखली जातेय.  दिल्लीच नव्हे तर वायू प्रदूषणाने (Air pollution) ग्रासलेल्या अनेक शहरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वायू प्रदुषणाची भीषणता सांगणारा आणखी एक अहवाल प्रसिद्ध झालाय. तुम्ही नेहमीच प्रदुषित वातावरणात राहू लागलात तर तुमच्या फुप्फुसांमधील पेशींना बाधा पोहोचते आणि त्याची परिणती कँसरसारख्या धोकादायक आजारात होऊ शकते, हे आतापर्यंत अनेकांनी सांगितलंय. मात्र दिल्लीसारख्या प्रदूषित शहरात  जर तीन वर्ष तुम्ही राहिलात तर ही शंका 73 टक्के खरी ठरू शकते.

33 हजार लोकांवर केलेल्या अभ्यासातून हे समोर आलंय. फुप्फुसांच्या कँसरशी झुंज देणाऱ्या रुग्णांचा अभ्यास या संशोधनात करण्यात आलाय. तपासणीअंती या रुग्णांच्या फुप्फुसांत अत्यंत बारीक प्रदूषित कण आढळून आले. या कणांमुळे एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर (EFGR) कँसर होण्याची शंका वाढून जाते. नॉन स्मोकर्स अर्थात जे लोक खूप जास्त सिगारेट पित नाहीत, त्यांना अशा कर्करोगाची शक्यता जास्त असल्याचंही या अहवालात म्हटलंय. इंग्लंडमधील फ्रांसिस क्रिक इन्स्टिट्यूटने याविषयी संशोधन केलंय.

रिसर्च करणारे चार्ल्स स्लँटन म्हणतात, माणसाचं वय वाढत जातं, तसं कँसर वाढवणाऱ्या पेशींची संख्या वाढत जाते. एरवी या पेशी सक्रिय नसतात. मात्र वायू प्रदूषण असल्यास या पेशी सक्रिय होतात. ट्यूमर झाल्यास किंवा त्यानंतर कँसर होण्याचा धोका जास्त असतो.

PM 2.5 ने 80 लाख लोकांचा मृत्यू

स्वँटन म्हणतात, फुप्फुसांच्या कँसरचे प्रमुख कारण वायू प्रदूषण आहे. त्यामुळे वायू प्रदूषण कमी करणे, रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न झाले पाहिजेत. जेणेकरून नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतील. पर्टिक्युलेट मॅटर अर्थात PM हे सर्वाधिक प्रभाव करणारे असतात. पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी हे आढळून येतात. PM 2.5 हे सर्वाधिक धोकादायक असतात. ते मायक्रोमीटर्सपेक्षाही लहान असतात.

हृदय विकार ते कँसर

PM 2.5 हे फुप्फुसांत आतपर्यंत रुततात. त्यामुळे आरोग्यासंबंधी इतर समस्यादेखील उद्भवू शकतात. याद्वारे कँसर दोन टप्प्यांतून होतो. पहिला म्हणजे, कँसर निर्माण करणारे घटक कँसरची निर्मिती करणारे जीन शोधून काढतात. दुसरे म्हणजे, आतापर्यंत निष्क्रिय अवस्थेत असलेल्या कँसरची निर्मिती करणाऱ्या पेशींना सक्रिय केलं जातं. या दोन टप्प्यांनंतर हा आजार वेगाने बळावतो. चार्ल्स आणि त्यांच्या टीमने सर्वात आधी उंदरांवर संशोधन केलं. त्यांना लॅबमध्ये वायू प्रदूषणात ठेवलं गेलं. वायू प्रदूषणामुळे उंदरांच्या फुप्फुसातील पेशींमध्ये बदल दिसून आला. PM 2.5 मुळे त्यांच्यात कँसरच्या पेशींची निर्मिती होऊ लागली.

धूम्रपान न करणाऱ्यांनाही धोका

दरम्यान, कॅनडातील उच्च वायू प्रदूषण असलेल्या परिसरातही यासंबंधीचे सर्वेक्षण झाले. या भागात धूम्रपान न करणाऱ्या लोकांच्या फुप्फुसांचीही तपासणी करण्यात आली. PM 2.5 त्यांनाही EGFR आधारीत फुप्फुसांचा कँसर होण्याची शक्यता ४० वरून ७३ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं.