मुंबई : बहुतेकजण ऑफिसमध्ये डेस्कवर बसून काम काम करतात. दररोज बसून काम असल्यामुळे लोकांच्या शरीराची हालचाल होत नाही. मात्र लोक याकेड जास्त गांभीर्याने लक्ष देत नाहीत. पण रोज बसून काम केल्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. अशातच नुकत्याच झालेल्या एका संशोधनामध्ये, एकाजागी जास्त वेळ बसून काम केल्यामुळे लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो असं समोर आलं आहे.
आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे आपल्या एनर्जीचा वापर होत नाही. जर आपण आपल्या एनर्जीचा वापर नाही केला तर अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. एका जागी बसून राहिल्यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, डायबिटीस सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त वेळ बसून राहिल्यामुळे शरीरातील चरबी झपाट्याने वाढते. तसेच हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या घातक आजारांचा धोकाही निर्माण होतो.
कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, जे लोक ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी बसून काम करतात त्यांना हृदयविकाराचा धोका असतो. तसंच जे लोक आठ तासांहून अधिक वेळ बसून काम करतात त्यांना स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका 20 वाढतो, अशी माहिती चायनीज अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि पेकिंग युनियन मेडिकल कॉलेजने केलेल्या अभ्यासात देण्यात आली आहे
दरम्यान, गेली 11 वर्ष करण्यात आलेल्या अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, एका जागेवरच काम असेल तर थोडा ब्रेक घ्यावा. तसेच जे लोक बसून काम करतात अशा लोकांनी दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. अन्यथा त्यांना या आजारांचा सामोरं जावू लागू शकतं. त्यामुळे वेळीच सतर्क व्हा आणि व्यायामाला लागा.