जन्मावेळी बाळाचं वजन किती हवं ? वजन कमी असल्याचे काय तोटे ?

| Updated on: Sep 30, 2024 | 5:47 PM

भारतात कमी वजन असलेल्या बाळांचा जन्म होण्याचे प्रमाण मोठे आहे. जन्माच्या वेळी मुलाचे वजन सामान्य वजन असावे. कमी वजनाच्या बाळांना अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी नेमकी काय काळजी घ्यावी याविषयीचा हा वृत्तांत पाहा

जन्मावेळी बाळाचं वजन किती हवं ? वजन कमी असल्याचे काय तोटे ?
Average baby weight
Follow us on

जन्माच्यावेळी कोणत्याही बाळाचे वजन सामान्य वजनापेक्षा कमी असेल तर ते बाळाच्या प्रकृतीला चांगले नसते. अतिशय कमजोर प्रकृतीच्या बाळाला अनेक आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे जन्मानंतर अशा नवजात शिशुला रुग्णालयात ठेवावे लागते. त्यामुळे प्रेग्नंसी दरम्यान मातेने आपल्या आहाराची काळजी घेऊन प्रकृती चांगली ठेवण्याची गरज असते. त्यामुळे बाळाचे वजन योग्य राहते. जन्माच्यावेळी बाळाचे वजन मोजले जाते.  कारण जन्मावेळी बाळाचे असलेले वजन त्याच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. जन्मावेळी बाळाचे वजन कमी असेल तर बाळाला शारीरिकदृष्ट्या कमजोर मानले जाते. अशा बाळाचा विकास नीट होत नसल्याने नीट काळजी घ्यावी लागते. अशी मुले खूप कमजोर होतात आणि त्यांना अनेक आजारांचा धोका असतो.

वजन किती असावे ?

सामान्यपणे वेळेवर जन्मलेल्या बाळाचे वजन जन्माच्या वेळी 2.5 किलोपेक्षा अधिक असायला हवे. जी मुलं दहाव्या महिन्यात जन्माला येतात त्यांचे वजन 3 ते 4 किलोपर्यंत देखील वाढलेले असते. त्याच्या उलट जी मुले वेळेआधीच जन्माला येतात. म्हणजेच सातव्या किंवा आठव्या महिन्यात जन्माला येतात त्या बाळांचे वजन सामान्य वजनापेक्षा कमी असते. तरीही जन्मावेळी बाळाचे वजन 2.5 ते 3 किलो असेल तर ते योग्य मानले जाते. तर 1.5 किलोहून कमी वजनाच्या बाळाला लो बर्थ वेट बेबी म्हटले जाते.

जन्मावेळी वजन कमी असणे धोकादायक

जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असणे योग्य मानले जात नाही. अनेकदा काही अवयव नीटसे विकसित झाल्याने आणि वेळे आधी जन्माला आल्याने वजन कमी भरते. अशा बाळांना अधिक काळजीची गरज असते. कारण अशी मुले स्वत:हून दूध पिण्याच्या स्थितीत नसतात. अनेकदा अशा बाळांना श्वास देखील घेता येत नाही. अशा नवाजात शिशूंना पीडीयाट्रीक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये सपोर्ट सिस्टीमवर ठेवले जाते. तेथे मशिनद्वारे त्यांची काळजी घेतली जात असते.

काविळीची तक्रार

कमी वजनाच्या बाळाला इतर सामान्य वजनाच्या बाळांच्या तुलनेत काविळ होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा बाळांचे शरीर जन्माच्यावेळी पिवळे पडते. या बाळात बिलीरुबिनची कमतरता असते. या बाळांना फोटोथेरपी दिली जाते.

हा एक प्रकारचा उपचार असून यात बाळांना इन्क्युबेटरच्या प्रकाशात बाळांना ठेवले जाते. त्याचे डोळे झाकले जातात. त्यामुळे तीव्र प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण होते. परंतू उर्वरित शरीराला लाभ होतो. त्यानंतर बिलीरुबिन चेक केले जाते. अन्यथा बाळांना अधिक काळ रुग्णालयात राहावे लागू शकते.

इंफेक्शनचा धोका

लहान मुलाला सर्वसामान्यत: इन्फेक्शनचा धोका असतो. परंतू ज्या बाळाचे वजन सामान्यपेक्षा कमी असते. त्यांची इम्युनिटी खूपच कमी असते. त्यांना वारंवार इन्फेक्शन होण्याचा शक्यता असते.

एनिमियाचा धोका

वजन कमी असल्याने बाळाला एनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरता होते, शरीरात आर्यनची देखील कमी होते. अनेकदा बाळाला रक्त चढवण्याची गरज असते.

बाळाचे वजन कसे नियंत्रित करावे

मातेने बाळाच्या जन्मावेळी योग्य आहारात करावा. आणि वेळोवेळी अल्ट्रासाउंड सोनोग्राफीच्या मदतीने बाळाच्या वजनाची खात्री करावी, त्यामुळे बाळाच्या जन्मावेळी त्याचे वजन योग्य राहते. आणि आरोग्यदायी बाळ जन्माला येते.