सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. नको ती आजारपणं मागे लागली आहेत. अनेकांना तर यूरीक अॅसिड आणि हाय कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. या आजाराचे नियंत्रण करण्यासाठी अनेक लोक औषधे घेत आहेत. पण कधी कधी औषधांचा अती वापर किंवा सतत सेवन केल्याने इतर समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घरगुती उपायांद्वारे यूरिक अॅसिड आणि हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू इच्छित असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते.
खरंतर, कच्चा लसूण खाल्ल्याने तुम्ही या दोन्ही आजारांवर नियंत्रण मिळवू शकता. लसूण ही प्रत्येक घरात सहज मिळणारी गोष्ट आहे. कोणत्याही पदार्थांना लसणाशिवाय चव येत नाही. आयुर्वेदामध्ये लसणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. कारण कच्चा लसूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये ‘अलिसिन’ नावाचा एन्झाइम असतो, ज्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतो.
मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि सेलेनियमच्या व्यतिरिक्त, लसणात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन B चे प्रमाण भरपूर आढळते. म्हणूनच, याचा वापर यूरिक अॅसिड आणि हाय कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे, लसूण खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहीत असणे आवश्यक आहे.
लसणाचे फायदे :
हृदयरोगापासून संरक्षण :
लसूण हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी करतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी (अथेरोमा) जमा होण्यापासून बचाव होतो. लसूण हे ॲस्प्रिनसारखे कार्य करते आणि स्ट्रोकच्या धोक्याला कमी करते.
उच्च रक्तदाब कमी करणे :
लसूण उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.
रक्त शुद्धीकरण :
लसूण रक्त शुद्ध करणारा म्हणून कार्य करतो.
थकवा कमी करणे :
दोन लसूण आणि थोडे लिंबू पाणी सकाळी सकाळीच घेतल्याने थकवा कमी होतो आणि शरीराची ऊर्जा वाढते.
कर्करोग प्रतिबंध :
लसूण नियमितपणे घेतल्याने फुफ्फुस, गळा, प्रोस्टेट, मूत्राशय, पचनसंस्थेचे आणि कोलन कॅन्सरच्या प्रतिबंधात मदत होते.
इम्युनिटी वाढवते :
लसणाचा चहा बनवून त्यात थोडं आलं किंवा मध घालून प्यायल्यास इम्यून सिस्टमला बळकटी मिळते.
पाणी गळती, सर्दी-ताप :
लसणाने सर्दी आणि नाकातून येणारे पाणी थांबविण्यास मदत होते. तसेच थोड्या प्रमाणात लसणाचा रस नाकात घातल्यास नाकातून येणारे पाणी थांबते.
एंटी-बॅक्टेरियल आणि एंटी-फंगल गुण :
लसणामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगल विरोधी गुण असतात.
रजोनिवृत्तीचा काळ :
लसूण शरीरातील इस्ट्रोजेन हॉर्मोनवर काम करून हाडांचे संरक्षण करतो.
डायबिटीस रोगींसाठी उपयुक्त :
लसूण डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
हाडांचा त्रास (Osteoarthritis) :
हाडांच्या दुखण्यांसाठी लसूण उपयुक्त आहे.
त्वचासंवेदनशीलतेसाठी :
स्क्लेरोडर्मा सारख्या त्वचासंवेदनशीलतेच्या विकारांवर लसूण उपयुक्त ठरतो.
यकृत विकार :
लसूण यकृताच्या विविध विकारांच्या उपचारात उपयोगी आहे.
कच्चा लसूण केव्हा आणि किती खावा?
कच्चा लसूण खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी लवकर. रिकाम्या पोटी सकाळी कच्चा लसूण खाल्ला, तर तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. रोज सकाळी 2 कच्चे लसूण खाऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी 2 लसूण पाण्यात भिजवून, सकाळी रिकाम्या पोटी ते खाल्ले जातात. परंतु, जर तुम्हाला कोणतीही एलर्जी असेल किंवा तुम्ही काही औषध घेत असाल, तर पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच कच्चा लसूण सेवन करा.
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)