महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर, 32 नवी प्रकरणे आली समोर

| Updated on: Jan 07, 2023 | 4:20 PM

महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस पुन्हा वाढल्या असून शुक्रवारी राज्यात 32 नवी प्रकरणे समोर आली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर, 32 नवी प्रकरणे आली समोर
Image Credit source: Tv 9 Bharatvarsh
Follow us on

मुंबई – चीनसह जपान, अमेरिका, दक्षिण कोरिआ , ब्राझीलसह जगभरात कोरोनाने (corona)पुन्हा एकदा थैमान माजवले आहे. चीनमध्ये तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एका अहवालानुसार, चीनची जवळपास निम्मी लोकसंख्या सध्या कोरोनाशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत भारतही कोरोनाबाबत अलर्ट मोडमध्ये (alert in India) आला आहे. भारतातही गेल्या 24 तासांमध्ये 214 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी 4 जणांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्राबद्दल सांगायचे झाले तर शुक्रवारी राज्यात (new cases in Maharashtra) 32 नवीन रुग्ण आढळून आले. त्यामध्ये मुंबई आणि पुण्यात रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

नव्या कोव्हिड केसेसचबाबत भारतातील राज्यांमध्ये महाराष्ट्र सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. 32 नवी प्रकरणे समोर आल्याने सध्या राज्यात 134 नवे रुग्ण आढळले आहेत. त्या 32 प्रकरणांपैकी मुंबईत 11 आणि पुण्यात 11 रुग्ण आढळले आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 81 लाख 36 हजार 780 इतकी झाली आहे. 12 हजार 96 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, 11 दिवसांत देशातील 124 आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनचे 11 उप-प्रकार आढळले आहेत. 23 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाहून एक 38 वर्षीय महिला मुंबईत आल्यावर सर्वप्रथम खळबळ उडाली होती. ही महिला मुंबईहून जबलपूरला गेली. तिला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. संबंधित महिलेचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. महिलेच्या नातेवाईकांचे नमुनेही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

केरळ-कर्नाटकमध्ये पसरली भीती, मुंबई-दिल्ली , तिसऱ्या व चौथ्या स्थानी

नवीन कोविड प्रकरणांमध्ये केरळची आकडेवारी भयावह आहे. केरळमध्ये कोरोनाचे 65 नवीन रुग्ण समोर आले आहेत. केरळमध्ये सध्या 525 सक्रिय प्रकरणे आहेत. केरळनंतर कर्नाटकात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात कोरोनाचे 38 नवे रुग्ण आहेत. सध्या कर्नाटकामध्ये 278 सक्रिय कोविड केसेस आहेत. केरळ आणि कर्नाटकानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 32 तर दिल्लीत 8 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत सध्या 23 सक्रिय प्रकरणे आहेत. अशा प्रकारे, सध्या भारतात 2509 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण

– सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार 24 डिसेंबर 2022 पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले.

– यामध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून 2 टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात येत आहे.