मुंबई | 21 डिसेंबर 2023 : कोरोना… ज्यामुळे तुम्हा आम्हा साऱ्यांनाच दोन वर्षांसाठी घरात राहावं लागलं. या दोन वर्षात प्रचंड नुकसान झालं. अनेकांचा रोजगार गेला. तर काहींनी आपल्या जिवलगांना गमावलं. आयुष्यातील सर्वाधिक खडतर वेळेपैकी एक म्हणजे हा कोरोना काळ… पण आता पुन्हा आपल्याला या सगळ्यातून जावं लागू शकतं का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण तो पुन्हा येतोय… होय कोरोना पुन्हा सक्रीय झालाय. कोरोचा नवा व्हेरियंट समोर आलाय आणि त्याचा रूग्णही महाराष्ट्रात आढळलाय. पण या कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात? वाचा…
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन1’ सध्या सक्रीय झाला आहे. या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला. केरळच्या थिरूवअनंतपुरममधील काराकुलम इथं 8 डिसेंबरला आढळला. त्यानंतर आता महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात ‘जेएन1’ चा एक रुग्ण आढळला आहे. गोव्यातही ‘जेएन1’ रुग्णांची नोंद झाली आहे. गोव्यात 19 संशयित रुग्णांची नोंद झालीय.
कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला आहे. त्यामुळे याची सरकारी पातळीवरही दखल घेण्यात आली आहे. राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये ‘जेएन1’ या नव्या व्हेरियंट रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतायेत. त्या पार्श्वूभूमीवर भारत आणि महाराष्ट्र अलर्टवर आहे.
कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. एकाला कोरोनाची लागण झाली आणि त्याच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली तर त्या दुसऱ्या व्यक्तीलाही कोरोना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी काही उपाय योजना करणं गरजेचं आहे.
शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. जर का घरून एखादं काम होत असेल तर त्यासाठी घराबाहेर जाणं टाळा. बाहेर जाताना मास्कचा वापर करा. स्कार्फ बांधून घराबाहेर पडा. सॅनिटायझरचा वापर करा. बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवा. अंघोळ करा. जेणे करून तुम्हाला कोरोनाची लागण होणार नाही.