जीभेची चव गेली, अन्नही गोड लागेना, म्हणून डॉक्टरांकडे गेला.. अन् कळलं जगण्यासाठी काही आठवडेच उरले !

| Updated on: Apr 06, 2023 | 3:54 PM

पोटाचा कॅन्सर शोधणे अनेकदा कठीण असते. कारण हा रोग शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यावरच लक्षणे पूर्णपणे दिसून येतात.

जीभेची चव गेली, अन्नही गोड लागेना, म्हणून डॉक्टरांकडे गेला.. अन् कळलं जगण्यासाठी काही आठवडेच उरले !
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : अनहेल्दी पदार्थ खाण्याची सवय केवळ तुमच्या टेस्ट बड्सला हानी पोहोचवत नाहीत तर त्यामुळे आरोग्यासाठीही (harmful for health) अनेक धोके देखील निर्माण करू शकतात. इंग्लंडमधील बर्नेज येथील रहिवासी असलेल्या पीट मर्फी यांच्या बाबतीतही असेच काहीसं घडलं. बरं वाट नाही म्हणून ते डॉक्टरांकडे गेला असतात ते पोटाच्या टर्मिनल कर्करोगाने (stomach cancer) ग्रस्त असल्याचे कळले आणि त्यांचे आयुष्यच उलटं-पालटं झालं ! त्यांच्याकडे जगण्यासाठी अवघे काही महिनेच उरल्याचे, डॉक्टरांनी (doctors)sनमूद केले.

55 वर्षांच्या पीट मर्फी यांच्या जीभेला काही काळापासून चव नव्हती. ते जे काही खायचे-प्यायचे त्या पदार्थांचीही चव त्यांना समजत नव्हती. हळूहळू त्यांचे पोटही दुखायला लागले. काहीतरी चुकतंय असं त्यांना वाटू लागलं. काही दिवसांनी तर त्यांना भूकच लागेनाशी झाली. पोटात अस्वस्थता जाणवल्यानंतर पीट मर्फी डॉक्टरांकडे गेले असता तेथे त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये असे आढळून आले की त्यांना पोटाचा कर्करोग असून तो शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. डॉक्टरांना असेही आढळले की मर्फी यांच्या पोटातील ट्यूमरला जागोजागी छिद्रे पडली आहेत. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

मात्र त्यांना ऑपरेशनसाठी नेले असता पोटात संसर्ग झाला होता. त्यांच्या पोटातील कॅन्सर पोटातून त्याच्या यकृतापर्यंत पसरल्याचे तपासणीत समोर आले. ही सर्व परिस्थिती व पीट यांची प्रकृती पाहून डॉक्टरांनी सांगितले की, आता या आजारावर काहीही करता येणार नाही, कारण त्याचा परिणाम इतर अवयवांवर होऊ लागला आहे. पीट यांच्याकडे अवघ्या काही महिन्यांचे आयुष्य उरल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

पोटाचा कॅन्सर झाल्यास संबंधित व्यक्तीच्या पोटात किंवा पोटाच्या आजूबाजूच्या कोणत्याही भागात गाठ तयार होते. हा आजार ओळखणे अनेकदा कठीण असते. कारण हा रोग शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यावरच लक्षणे पूर्णपणे दिसून येतात. पोटाच्या कर्करोगाची लक्षणे पचनाशी संबंधित समस्यांशी जुळणारी असल्यावे अनेक लोकं ती सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्यामुळे आजार आणखी पसरून गंभीर स्वरूप धारण करतो.

पोटाच्या कॅन्सरची लक्षणे

1. आजारी वाटणे

2. अन्न गिळण्यात अडचण येणे

3. ॲसिड रिफ्लेक्स

4. पोटात जळजळ जाणवणे

5. खूप जास्त ढेकर येणे

6. आंबट ढेकर येणे

7. फारसे न खाताही लवकर पोट भरणे

8. पोटात गाठ जाणवणे

9. एनर्जी कमी होणे

10. पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे

11. भूक न लागणे

12. काहीही कारण नसताना वजन कमी होणे

ही लक्षणे फक्त पोटाच्या कॅन्सरमध्येच दिसून येतात का ?

पचनाशी संबंधित समस्या हे कोलन कॅन्सरचे लक्षण असू शकते. पण पचना संदर्भातील एखादी समस्या कर्करोगाचे लक्षण असेलच असे नाही. मात्र तुम्हाला बऱ्याच काळापासून पोटाशी संबंधित समस्या जाणवत असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील ती सामान्य समस्या समजण्याची किंवा त्याकडे अजिबात दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. तुमच्या शरीरात ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

1. अन्न-पाणी गिळण्यात अडचण येणे

2. पोटात गाठ जाणवणे

3. अनावश्यक वजन कमी होणे

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)