पपई आपल्या आरोग्यासाठी किती चांगली असते. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पपई खाण्याचे अनेक फायदे असतात. पण तुम्हाला कदाचित हे माहित नसेल की पपईच्या बियासुद्धा तेवढ्याच आरोग्यवर्धक असतात. जाणून आश्चर्य वाटलं ना, कारण आपण सगळेच पपईच्या बिया फेकून देतो. पण त्यांचे इतके फायदे असू शकतात याची कल्पना कदाचित सर्वांना असते.
या बियांना किंचित कडू आणि मिरपूडसारखी चव असते. शक्यतो आपण या बिया फेकून देतो, पण तुम्हाला याचे फायदे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल. पपईमध्ये औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत करतात. पपई हे बाराही महिने सहज उपलब्ध असणारे फळ आहे.
कच्ची पपईसुद्धा खाल्ली जाते आणि पिकलेल्या स्वरूपात सुद्धा खाली जाते. जी कच्ची पपई असते त्या पपई पासून दूध काढले जाते आणि त्याचे पापिंस बनवले जाते याचा उपयोग ड्रायफूट व मैद्याच्या पदार्थांमध्ये जास्त केला जातो. पचन संदर्भातील ज्या काही गोळ्या बनवल्या जातात त्या गोळ्या पपईच्या दुधापासून बनवलेले असतात.
बहुतेक वेळा जेव्हा आपण पपई चिरल्यावर पपईच्या काळया बिया फेकून देतो. परंतु या पपईच्या बिया आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात याबद्दल अनेकांना माहित नसतं. नेमके याचे काय फायदे असतात ते पाहू.
पपईच्या बियांच्या सेवनाचे फायदे
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींना पपईसोबतच पपईच्या बियांचाही वापर केला जातो. आपण या बियांना सुकवून ठेवू शकतो आणि त्याची पावडर बनवून सुद्धा विविध पदार्थांसोबत त्याचे सेवन करू शकतो. ज्या व्यक्तींना शुगरची समस्या आहे, तसेच पचनासंबंधीची समस्या असेल यावर सुद्धा या बिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर पपईच्या बिया शरीरामध्ये कॅन्सर पेशींची वाढ होण्यापासून सुद्धा रोखतात.
पचनासंबधी तसेच पोटासंबंधीचे आजार दूर होतात
ज्यांना पचनासंबधी किंवा बद्धकोष्ठताची समस्या असेल. त्यांच्यासाठी तर पपईच्या बिया या रामबाण उपाय असतात. तीन ते चार बियांचे सेवन केल्यास तर बद्धकोष्टतेची समस्या लवकरच दूर होते. जर एखाद्या व्यक्तीला चिकनगुनिया, मलेरिया, डेंगू यासारखे आजार झाले असतील तर अशा वेळीसुद्धा पपई खाण्याचा सल्ला दिला जातो व त्याचबरोबर पपईच्या पानांचा रस प्यायल्याने व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास मदत होते.
तसेच जर तुमचे पोट साफ होत नसेल, पोटामध्ये गॅस निर्माण झाला असेल तर कच्च्या पपईची भाजी सुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा पपईच्या बियांचेही सेवन करू शकता.
पपईच्या बिया सौंदर्यासाठी वरदान
सौंदर्यप्रसाधने मध्ये सुद्धा पपईचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जर चेहऱ्यावर वयाच्या आधीच सुरकुत्या जाणवत असतील, त्वचा निस्तेज झाली असेल तर अशा वेळी पपई पासून बनवलेले फेस पॅक वपारू शकतो किंवा घरी तयार करू शकतो. पपईच्या वापराने आपली त्वचा सतेज बनते व चेहऱ्यावर कोणते प्रकारचे काळे डाग असतील तर ते निघून जातात.
पपईमध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहे ते बाहेर काढण्यासाठी मदत होतात. पपई फळ हे उष्णता प्रदान करणारे फळ आहे, ज्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये होतो अशा व्यक्तीने पपईचे फळ खाणे टाळावे किंवा अतिशय कमी प्रमाणात खावे.
जर आपण पपईच्या बियांचा खलबत्त्यामध्ये बारीक वाटून पाण्यासोबत सेवन केले तर आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर होण्यास मदत होतात. तसेच पोट साफ राहिल्याने चेहऱ्यावरही एक चमक येते.
( डिस्क्लेमर- वरील माहिती उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे दिलेली आहे. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या)