नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात हाहाःकार उडवला आहे. आरोग्य यंत्रणेची प्रचंड तारांबळ उडत आहे. आरोग्य यंत्रणेवर आधीच ताण आला असताना ऑक्सिजन आणि लसींच्या तुटवड्याचा प्रश्नही अजून गंभीरच आहे. त्या पार्श्वभूमीवर विषाणूचा संसर्ग वेळीच रोखता कसा येईल, लोकांना हा संसर्ग होणार कसा नाही, याकडे सरकारने लक्ष दिले आहे. याचवेळी कोणत्याही कोरोना रुग्णाने किरकोळ लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नये, असे आवाहन सरकार आणि तज्ज्ञांकडून वारंवार केले जात आहे. कोरोनोची किरकोळ लक्षणे दिसली तरी हयगय न करता स्वत:ला आयसोलेट केले पाहिजे, असा सल्ला मेदांता रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर नरेश त्रेहन यांनी दिला आहे. बहुतांश लोकांना खोकला, सर्दी, गळ्यात खवखव किंवा अन्य त्रास वा ताप येत आहे. यातील काही लक्षणे किरकोळ असली तरी अशाच किरकोळ लक्षणांचे बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे किरकोळ लक्षणे दिसली तरी लोकांनी स्वत:ला तत्काळ आयसोलेट करून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्यापर्यंत पोहोचलेला विषाणू इतरांपर्यंत पोहोचू शकणार नाही, असे डॉ. त्रेहन यांनी नमूद केले आहे. (Many people who have a cold, cough corona positive, doctor’s advice not to ignore)
देशातील लसींच्या तुटवड्याचा प्रश्न जैसे थे आहे. भारतात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिनपाठोपाठ आता स्पुटनिक व्ही या रशियन लसीलाही मान्यता मिळाली आहे. पुढील आठवड्यात ही लस कोरोना लसीकरण मोहिमेत वापरात येणार आहे. मात्र रशियाने मागणीच्या तुलनेत लसींचे उत्पादन केलेले नाही. त्यामुळे देशातील लसींचा प्रश्न इतक्यात सुटेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. असे असले तरी लसींबाबत पॅनिक होण्याची गरज नाही, असे डॉ. त्रेहन यांनी म्हटले आहे. मला वाटते, ज्या ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत, त्याठिकाणी 6 आठवड्यांत कोरोना लसीकरण मोहिम राबवली पाहिजे. परंतु, ज्या परिसरात रुग्णसंख्या कमी होत आहे, त्या परिसरात दोन डोसमधील अंतर वाढवले जाऊ शकते, असे मत डॉ. त्रेहन यांनी व्यक्त केले आहे.
लसींसंदर्भातील प्रश्नावर एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, वैश्विक आणि राष्ट्रीय पातळीवर नेहमीच काही ना काही प्रमाणात लसींची कमतरता राहील. पुढील दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर लसींची उपलब्धता होण्याची शक्यता आहे. कारण लस उत्पादक कंपन्या आपले उत्पादन प्लाण्ट सुरू करणार आहेत. तसेच भारताला बाहेरूनही अर्थात परदेशातूनही लसी मिळणार आहेत. आपल्याला आरोग्याच्या चांगल्या पायाभूत सुविधा आणि कोविड उपयुक्त व्यवहार करावा लागेल, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. (Many people who have a cold, cough corona positive, doctor’s advice not to ignore)
रेकॉर्ड स्तरावरून अजूनही सोने 9 हजारांनी स्वस्त; ‘या’ आठवड्यात किमती घसरल्या, पटापट तपासा नवे दर#businessnewsinmarathi #gold #goldprice #GoldPriceTodayhttps://t.co/ivG7MuSeFg
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2021
इतर बातम्या
सरकारी नोकरीसाठी संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, केंद्रीय गृहमंत्रालयात काही पदांसाठी भरती
कोरोना काळातही ‘या’ कंपनीकडून 36000 रुपयांची ऑफर, स्वस्तात खरेदी करा बेस्ट फॅमिली कार