नवी दिल्ली : एखादी व्यक्ती प्रेमात असली की त्याला बाकी कोणत्याची औषधांची गरज नसते, असं म्हणतात. तुम्ही प्रेमात असाल किंवा विवाहित (married) असाल तर हृदयविकाराचा धोका (heart disease risk) आपोआप कमी होतो. असा दावा अमेरिकेतील एका शास्त्रज्ञाने केला आहे. गेल्या दशकापासून हृदयविकाराने त्रस्त असलेल्या अशा लोकांचा या संशोधनात समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये असे उघड झाले आहे की ज्यांचे लग्न झाले नाही अशा लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट असते. तर जे लोक विवाहित आहेत आणि आपल्या जोडीदारासोबत आनंदी असतात ते या आजारावर विजय मिळवतात. विशेष म्हणजे हृदयविकाराच्या झटक्यासोबतच कॅन्सर, रक्तदाब (cancer and blood pressure) यांसारख्या आजारांचे टेन्शनही दूर राहते.
कोलेरॅडो युनिव्हर्सिटीतील डॉ. कॅटरीना लीबा यांनी हे संशोधन केले असून अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी कॉन्फरन्समध्ये त्यांनी ते (संशोधन) सादर केले होते.
रिलेशनशिप स्टेटस ठरवतं तुमच्या आरोग्याची स्थिती
डॉ. कॅटरिना लीबा यांच्या मते, एखाद्या व्यक्तीचे आरोग्य कसे आहे हे त्याच्या नातेसंबंधाच्या स्थितीवरून कळू शकते. सध्याची लोकं हळूहळू म्हातारी होत आहेत आणि त्यांच्या आयुष्याचा कालावधीही वाढला आहे, अशा परिस्थितीत त्यांना आधाराची आवश्यकता असतानाच हेही (नातेसंबंध व आरोग्याचा परस्परसंबंध) जाणून घेणे महत्वपूर्ण ठरते. आपल्याला रुग्णांच्या वैद्यकीय जोखमीचा केवळ विचार करण्याची गरज नाही, तर त्यांच्या आयुष्याच्या संदर्भाचाही विचार केला पाहिजे, असे डॉ. कॅटरिना यांनी नमूद केले.
पुरुषांसाठी फायदेशीर ठरतो विवाह
1893 सालापासून ते 2019 पर्यंत, यूकेमध्ये प्रत्येक दशकात विवाहाची संख्या कमी होत गेली आहे. डॉ. कॅटरिनाच्या म्हणण्यानुसार, याआधी केलेल्या संशोधनात असेही समोर आले आहे की विवाहित जोडपे दीर्घायुष्य जगतात, विशेषतः पुरुषांसाठी ते अधिक फायदेशीर असते. खरंतर तुमचा जोडीदार कोणताही असो, तो तुमचा एकटेपणा आणि मानसिक समस्या कमी करतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
अविवाहीत लोकांना हार्ट ॲटॅकचा धोका जास्त
डॉ. कॅटरिना यांनी 6800 लोकांवर संशोधन करून त्यांच्या आरोग्याची आणि वैवाहिक स्थितीची माहिती गोळा केली. विवाहित लोकांच्या तुलनेत अविवाहित व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुप्पट असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. महिला पतीच्या औषधोपचारापासून ते डॉक्टरांच्या अपॉईंटमेंटपर्यंत प्रत्येक गोष्टीची नीट काळजी घेतात, असेही दिसून आले.
महिलांवर होत नाही परिणाम
एकीकडे लग्नानंतर पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो, तर दुसरीकडे महिलांवर (लग्नाचा) याचा फारसा फरक पडत नाही, असेही त्यात दिसून आले.