मुंबई, धावपळीच्या आणि व्यस्ततेने भरलेल्या या जीवनात प्रत्येकजण अनेक समस्यांशी झुंजत आहे. कामाचा भार आणि वैयक्तिक आयुष्यात वाढत्या समस्यांमुळे लोकांना अनेकदा तणावाचा सामना करावा लागतो. आजच्या काळात तणाव ही एक अशी समस्या बनली आहे, ज्याचा परिणाम फक्त प्रौढांवरच नाही तर लहान मुलांवरही होतो आहे (Child Mental Health). अभ्यासाचे दडपण आणि कोरोनानंतरच्या जीवनातील बदलांमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे. जर तुमचे मुलं देखील तणाव किंवा इतर कोणत्याही मानसिक समस्यांशी झुंजत असतील, तर तुम्ही युनिसेफने दिलेल्या या टिप्सद्वारे (Tips) तुमच्या मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकता.
तुमच्या मुलांचे म्हणणे ऐका, त्यांना प्रोत्साहित करा आणि त्यांना त्यांचे विचार आणि भावना शेअर करताना सुरक्षित वाटेल याची खात्री करा. मुलांचे ऐकताना तुम्ही त्यांच्या मताला महत्त्व देत आहात हे त्यांना कळू द्या. एक घाव दोन तुकडे असं करू नका.
तुमच्या मुलाशी प्रामाणिक राहा आणि तुमच्या शब्दांतून आणि हावभावांद्वारे तुम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहात याची जाणीव करून द्या. यामुळे तुमच्यात आणि मुलांमध्ये मैत्रीपूर्ण नाते निर्माण होईल.
आपल्या मुलाने जे चांगले केले त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. चांगले कामं करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. आयुष्याचे सकारात्मक पैलू त्यांना अनुभवातून पटवून द्या. जेव्हा तुमचे तुमच्या मुलाशी एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद असतील, तर त्यावर सुवर्णमध्य काढा.
आपल्या मुलाला कधीही एकटे वाटणार नाही याची खात्री करा. त्यांना खात्री द्या की जर त्यांना कधीही काहीही सांगायचे आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी कायम उपलब्ध आहात हे त्यांना कळू द्या.