मुंबई, कोरोनामुळे (Corona) फक्त शरीरावरच नाही तर मानसिकतेवरही परिणाम झाला आहे. कोरोनानंतर किशोरवयीन मुलं आता प्रौढांप्रमाणे विचार करू लागले आहेत, ज्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. या तणावामुळे किशोरवयीन मुलांमध्ये खेळकरपणा कमी झाल्याचे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे. कोरोना काळानंतर मुलं प्रौढांप्रमाणे विचार (Teenage mental Health) करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अभ्यासात नवीन निष्कर्षांचा उल्लेख करण्यात आला आहे की पौगंडावस्थेतील साथीच्या रोगाचा न्यूरोलॉजिकल आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम अधिक वाईट असू शकतो. या बद्दलची माहिती जैविक मानसोपचार: ग्लोबल ओपन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, 2020 मध्येच प्रौढांमधील चिंता आणि नैराश्याचे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढले आहे. या संदर्भात शोधनिबंधाचे लेखक इयान गॉटलीब यांनी सांगितले की, साथीच्या रोगाचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे हे सगळ्यांना माहिती होते मात्र हा परिणाम किती खोलवर झाला आहे याचा नेमका अंदाज समोर आलेला नव्हता.
गॉटलीब म्हणाले की, वयानुसार मेंदूच्या संरचनेत बदल नैसर्गिकरित्या होतात. पौगंडावस्थेच्या सुरुवातीच्या काळात, मुलांच्या शरीरात हिप्पोकॅम्पस आणि अमिग्डाला (मेंदूचे क्षेत्र जे काही विशिष्ट आठवणींवर नियंत्रण ठेवतात आणि भावना आयोजित करण्यात मदत करतात) या दोन्हीमध्ये वाढीचा अनुभव घेतात. त्याच वेळी, कॉर्टेक्समधील ऊती पातळ होतात.
गॉटलीबच्या अभ्यासात, कोरोनापूर्वी आणि त्यादरम्यान घेतलेल्या 163 मुलांच्या एमआरआय स्कॅनची तुलना केली, असे आढळून आले की लॉकडाऊनच्या अनुभवामुळे किशोरवयीन मुलांमध्ये विकासाची ही प्रक्रिया गतिमान झाली. असे जलद बदल केवळ अशा मुलांमध्येच दिसून आले आहेत ज्यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. यामागे हिंसा, दुर्लक्ष, कौटुंबिक समस्या असे अनेक करणं आहेत. अभ्यासात समोर आलेले परिमाण हे कायमस्वरूपी राहणार अथवा नाही हे आताच सांगणे शक्य नसल्यचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
एका विशिष्ट काळानंतर मेंदूच्या वयात समानता येणार की नाही हे स्पष्टपणे सांगणे कठीण आहे मात्र 16 वर्षांच्या मुलाचा मेंदू अकाली वृद्ध होत असेल तर भविष्यात याचे परिणाम नकारात्मक असू शकतात. गॉटलीब यांनी स्पष्ट केले की मूलतः त्यांचा अभ्यास मेंदूच्या संरचनेवर कोविड-19 चा परिणाम पाहण्यासाठी डिझाइन केलेला नव्हता. साथीच्या रोगापूर्वी, त्याच्या प्रयोगशाळेने सॅन फ्रान्सिस्को बे एरियाच्या आसपासच्या मुलांचा आणि किशोरवयीन मुलांचा एक गट नैराश्यावरील दीर्घकालीन अभ्यासात भाग घेण्यासाठी भरती केला होता, परंतु जेव्हा कोरोना आला तेव्हा त्यांना नियमितपणे नियोजित एमआरआय स्कॅन मिळू शकले नाहीत.
अमेरिकेच्या कनेक्टिकट विश्वविद्यालय येथील सह-लेखक जोनास मिलर यांनी सांगितले की, किशोर वयात होत असलेले हे बदल संपूर्ण पिढीसाठी नकारात्मक परिणाम देणारे ठरू शकते, कारण किशोरावस्थेत निसर्गतःच मेंदूचा तसेच मानसिक विकास हा झपाट्याने होत असतो. अशात गरजेपेक्षा जास्त गतीने जोखीम निर्माण होऊ शकते.