Mental Health: राग आल्यावर आरडा-ओरडा करता, मानसिक आरोग्यावर होतो ‘हा’ परिणाम

| Updated on: Sep 25, 2022 | 9:14 PM

राग आल्यावर अनेक जण मोठ्याने ओरडतात. त्यांच्या या सवयीचा अनेकांना त्रास देखील होतो पण याचा ओरडणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यवर काय परिणाम होतो. जाणून घ्या

Mental Health: राग आल्यावर आरडा-ओरडा करता, मानसिक आरोग्यावर होतो हा परिणाम
मानसिक आरोग्य
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  मोठ्याने ओरडणे (Yelling) चुकीचे समजतात पण ओरडण्याचा काही आरोग्यदायी फायदे (Health Benefits) देखील आहेत हे तुम्हाला माहिती आहे काय?  ही कृती आपल्याला स्वतःला संतुलित करण्यास आणि आपले मानसिक आरोग्य मजबूत करण्यास मदत करू शकते. ओरडल्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यव(Mental Health) दीर्घकालीन परिणाम होतो याबद्दल तज्ज्ञांकडे विशेष पुरावे नसल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, मानसशास्त्रज्ञ आर्थर जानोव्ह यांनी 1960 च्या दशकात आरोग्याच्या फायद्यांसह ओरडण्याच्या कृतीचा संबंध जोडला. आर्थर या गोष्टीवर जोर देत होते की अनेक वेळा लोकांना त्यांच्या बालपणी झालेल्या समस्यांचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत ओरडणे त्यांना त्यांच्या वेदना कमी करण्यास मदत करते. 1970 च्या दशकात त्यांच्या या मताची खूप चर्चा झाली होती.

काही  तज्ञांचे म्हणणे आहे की या थेरपीच्या समर्थनार्थ फारसा पुरावा नाही आणि त्याचा प्रभाव किती काळ टिकतो याबद्दल मतमतांतरे आहेत. झुरिच विद्यापीठातील मानसशास्त्र विभागातील प्रोफेसर साशा फ्रुहोल्झ यांनी सांगितले की, आरडाओरडा केल्याने उपचारांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचा कोणताही पुरावा नाही.

थेरपीचा कोणताही ठोस पुरावा नाही

ते म्हणाले की, सध्या मानसोपचार हा पुराव्यावर आधारित आहे, त्यामुळे आज या पद्धतीला उपचार म्हणून कोणीही गांभीर्याने घेत नाही. ओरडणे एखाद्याला भूतकाळातील घटना विसरण्यास किंवा सहन करण्यास मदत करते या विश्वासावर ही पद्धत अंशतः आधारित असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात

मानसशास्त्रज्ञ फ्रुहोल्झ यांच्या मते ही पद्धत प्रामुख्याने रागाच्या भरात ओरडण्याचा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. ते म्हणाले की येथे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की आपल्याला सकारात्मक ओरडणे आणि नकारात्मक ओरडणे यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. दोन प्रकारच्या ओरडण्यात मोठा फरक आहे.