मुंबईः शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतची फॅन फॉलोइंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. इंस्टाग्रामवर तिचे ३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. मीरा राजपूत खूप सुंदर आहे आणि तिची त्वचा देखील खूप ग्लोइंग आहे. इन्स्टाग्रामवरही ती बर्याचदा त्वचेच्या काळजीशी संबंधित (Related to skin care) व्हिडिओ शेअर करत असते. याशिवाय तिच्या सर्व फोटोवरून तिच्या चमकदार त्वचेचा अंदाज लावता येतो. फोटोंमध्ये मीरा एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक (Fresh and energetic) दिसते आहे. मीरा आपल्या त्वचेचे पोषण करण्यासाठी अनेकदा नैसर्गिक घटकांचा (Of natural ingredients) वापर करते. मीराच्या स्किन केअर रूटीनबद्दल बोलताना मीरा राजपूत नैसर्गिक गोष्टींचा भरपूर वापर करते. हळद, मध, गुलाबपाणी या नैसर्गिक सौंदर्य घटकांच्या मदतीने मीरा तिच्या त्वचेचे पोषण करते आणि त्वचा निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते. जाणून घ्या, मीरा राजपूतच्या काही ब्युटी हॅक..
सौंदर्य प्रसाधनांमध्ये हळदीचा वापर वर्षानुवर्षे होत आहे. मध त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. मीरा हळद आणि मधाची पेस्ट त्वचेवर लावते. हे त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते. मध आणि हळद मिक्स करून ही पेस्ट त्वचेवर लावल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करावा. हा मसाज मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला चमक आणण्याचे काम करते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे कोटिंग बहुतेक त्वचेच्या प्रकारांना शोभते.
मीराही अनेकदा त्वचेवर कच्चे दूध वापरते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी कच्चे दूध खूप चांगले काम करते. सन डॅमेज आणि टॅनिंग सारख्या समस्या दूर करते. मीरा तिच्या त्वचेबरोबरच तिच्या लहान मुलांच्या त्वचेवरही कच्चे दूध वापरते. कधीकधी मीरा दही, बेसन आणि मध यांचा फेस पॅक वापरते.
मीरा त्वचेच्या काळजीसाठी देशी तूप देखील वापरते. तुमच्या त्वचेचे नैसर्गिक तेल टिकवून ठेवण्यासाठी तूप उपयुक्त मानले जाते. हे त्वचेला डिटॉक्सिफाय करण्याचे काम करते, ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकते.
मीरा सांगते की, जर तुम्हाला त्वचेवर नैसर्गिक चमक आणायची असेल, तर त्वचा हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. मीरा त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. याशिवाय रसदार फळे आणि अधिक पाणी असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करते.