Monkeypox Virus | ‘गर्भवती महिलां’ सह मुलांना मंकीपॉक्सचा सर्वाधिक धोका; असे करा त्यांचे संरक्षण!

| Updated on: Jul 25, 2022 | 4:27 PM

Monkeypox Virus | मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सरकारने जनतेला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विशेषतः लहान मुले आणि गर्भवती महिलांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास मंकीपॉक्सचा धोका वाढतो.

Monkeypox Virus | ‘गर्भवती महिलां’ सह मुलांना मंकीपॉक्सचा सर्वाधिक धोका; असे करा त्यांचे संरक्षण!
मंकीपॉक्सवर करा आयुर्वेदाचे उपचार
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Monkeypox Virus | मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण दिल्लीत नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी केरळमध्ये तीन जणांना मंकीपॉक्सची लागण (Monkeypox infection) झाली आहे. तिघेही संयुक्त अरब अमिराती तून परतले आहेत. त्याच वेळी, चौथ्या व्यक्तीने अलीकडच्या काळात परदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे दिल्लीतील एका व्यक्तीला घरी असतानाही मंकीपॉक्सची लागण कशी झाली हा चिंतेचा विषय आहे. सध्या सर्व बाधितांवर रुग्णालयात (Infected in hospital) उपचार सुरू आहेत. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सरकारने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विशेषतः लहान मुले आणि गर्भवती महिलांनी ( pregnant women)आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास मंकीपॉक्सचा धोका वाढतो. मुले आणि गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. तसेच लहान मुलांना याचा जास्त धोका असतो. याआधी 1970 मध्ये 9 वर्षांच्या लहान मुलामध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता.

काय सांगते संशोधन

गर्भवती महिलांनाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन काँगोमध्ये करण्यात आले होते, ज्यामध्ये 216 महिलांचा समावेश होता. या संशोधनात सहभागी 5 पैकी 4महिलांचा गर्भपात झाला होता. त्याच वेळी, गर्भात वाढणाऱ्या मुलांमध्येही मांकीपॉक्सची लक्षणे आढळून आली. यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाही हा आजार हेाऊ शकतो. यासाठी बाधित व्यक्तीपासून सुरक्षीत अंतर ठेवणे कधीही चांगले. स्वतःला लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून आजारा बाबत खात्री करून घ्यावी.

हे सुद्धा वाचा

गर्भवतीसाठी विशेष आहार

-रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खा. रोज हळदीचे दूध प्या. अन्नपदार्थ शेअर करू नका. तसेच, ब्रश, टूथपेस्ट, टॉवेल इत्यादी गोष्टी शेअर करू नका. संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवा. त्यासाठी सर्दी, खोकला आणि मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीपासून तत्काळ वेगळे होणेच जास्त चांगले. स्वतःघराबाहेर मास्क लावा. याच्या मदतीने तुम्ही कोरोना विषाणूंचा संसर्गही टाळू शकता.

 

खाद्यपदार्थ तुम्‍हाला रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वेगाने वाढवून मंकीपॉक्‍स पासून दूर राहण्यास मदत करेल. जाणून घ्या, कोणता आहार तुम्हाला मंकीपॉक्स पासून वाचवू शकतो. तुम्ही आहारात लिंबू आणि लिंबू वर्गीय आंबट पदार्थाचा समावेश करू शकता. जर तुम्हाला ते आवडत नसेल तर पपईसह इतर गोड फळे खा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. आयुर्वेदात तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. कारण, ते औषधाचे काम करतात.  जेवणाची चव वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर औषध म्हणूनही केला जातो. हे अनेक रोगांवर उपचार मानले जाते.