Mood Boosting Food: वारंवार बिघडणारा मूड सुधारायचा असेल तर खा ‘हे’ पाच पदार्थ

| Updated on: Sep 13, 2022 | 5:47 PM

बऱ्याच वेळेस एखाद्या व्यक्तीला खूप ताण आणि थकवा जाणवतो. अशा वेळी तुम्ही अनेक प्रकारच्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करु शकता. हे पदार्थ खाल्याने तुमचा बिघडलेला मूड चांगला होऊ शकतो.

Mood Boosting Food: वारंवार बिघडणारा मूड सुधारायचा असेल तर खा हे पाच पदार्थ
डार्क चॉकलेट
Image Credit source: Social Media
Follow us on

आजकाल खराब जीवनशैलीमुळे (bad lifestyle) लोकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव यामुळे लोकांचे जीवनमान बिघडले आहे. वाढते वजन, ताण, तणाव, चिंता या समस्यांचा (problems) लोकांना सामना करावा लागतो. या समस्या दूर करण्यासाठी सकस आहार घेणे (nutritious food) तर गरजेचे आहेच, पण त्यासोबतच नियमितपणे व्यायाम करणेही महत्वपूर्ण ठरते. सकस आहारात आपण अनेक प्रकारचे पदार्थ समाविष्ट करू शकतो, जे आपला मूड सुधारण्यास मदत करतील. या पदार्थांमध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ते आपल्याला दिवसभर उत्साही व उर्जावान ठेवण्यास मदत करतात. बिघडलेला मूड सुधारण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता, ते जाणून घेऊयात.

 

केळी

केळ्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन बी 6 असते. हे मूड सुधारण्याचे काम करते. यामुळे दिवसभर उत्साही वाटतं. तसेच तुमचा मूडही फ्रेश राहतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. चांगली व पुरेशी झोप झाल्यास त्याचा आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. तुम्ही नियमितपणे केळ्याचे सेवन करू शकता. केळं खाल्यामुळे आरोग्यास इतरही अनेक फायदे मिळतात.

हे सुद्धा वाचा

ओट्स

तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करू शकता. दिवसाची सुरुवात करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. ओट्सचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे थकवा दूर होतो. ओट्स हे इन्स्टंट मूड बूस्टर म्हणून काम करते. ओट्स आपल्याला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करतात.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटचे सेवन आपला मूड सुधारण्याचे काम करते. डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे मेंदूमध्ये डोपामाइनही वाढते. ज्यामुळे आपला मूड सुधारतो. डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने आपल्याला दिवसभर उर्जावान आणि उत्साहित राहण्यास मदत होते. तुम्ही सामान्य चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खाऊ शकता.

सुका मेवा

तुम्ही तुमच्या आहारात सुकामेव्याचा समावेश करू शकता. काजू आणि बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ते मूड सुधारण्याचे काम करतात. रात्री भिजवून ठेवलेला सुका मेवा तुम्ही सकाळीदेखील खाऊ शकता. सुका मेवा हा पोषक तत्वांनी समृद्ध असतो. त्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

बीन्स व डाळी

बीन्स आणि डाळी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यात झिंक आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यांच्या सेवनामुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते. त्यांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बीन्स व डाळी या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )