डासांनी छळ मांडलाय, घरच्या घरी करा डासांचा बंदोबस्त

| Updated on: Apr 10, 2023 | 5:24 PM

हल्ली उष्णता जसजशी वाढत आहे, तसा डासांचा प्रादुर्भावात वाढ होत आहे. घरात सहज उपलब्ध वस्तूंचा वापर करुन डासांना अशा प्रकारे सहज पळवा.

डासांनी छळ मांडलाय, घरच्या घरी करा डासांचा बंदोबस्त
mosquito
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली :  सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उष्णता वाढत चालली आहे. अशा डासांचा प्रादूर्भाव हल्ली वाढतच चालला आहे. डासांमुळे अनेकांची झोपमोड होत असते. डासांच्या मुळे अनेक जीवघातक आजार होत असतात. मलेरीया आणि डेंग्यू सारखे जीवघातक आजार डासांद्वारे होत असतो. त्यामुळे डासांना उपद्रव कमी करण्यासाठी मच्छर कॉईल पासून अनेक उपाय केले जात असतात. आज आपण डासांना पळवून लावण्याचे काही देशी घरगुती उपाय पाहूयात.. यामुळे तुम्हाला कमी खर्चात डासांपासून सुटका मिळण्यास मदत मिळेल.

1. कापूर जाळावा

डासांना पळविण्यासाठी आपण कापूरचा वापर करू शकता. कापूराच्या तीव्र वासाने डासांना पळवून लावता येते. कापूर हा एंटीबॅक्टेरीयल असून डिसइंफेक्टेंट सारखा काम करतो. मच्छरांना पळवून लावण्यासाठी काही कापूर जाळून एका कोपऱ्यात त्यांचा धुर तयार करा. सर्व दारे आणि खिडक्या लावा सारे डास यामुळे मरतील.

2. लिंबाची पाने जाळा

लिंबाची पाने जाळण्याची पद्धत खूपच जुनी आहे. कडूलिंब हा अण्टी बॅक्टीरियल आहे. याच्या कडू वासाने मच्छर पळवून लावण्यासाठी फायदा होतो. लिंबाची पाने जाळून त्याची धुरी घरात सर्वत्र पसरविल्यास त्याचा फायदा होता. घरातून मच्छर, डासांना पळविण्यासाठी हा खूपच चांगला उपाय आहे.

3. शरीराला थंड तेल लावावे

शरीराला कोणतेही थंड तेल लावले तरी त्याचा फायदा होत असतो. हे तेल शरीरावर प्रोटेक्टीव्ह लेयर सारखी सुरक्षा म्हणून काम करीत असते. याच्या वासाने डांस – मच्छर पळून जातात. थंड तेलाचा प्रयोग केल्यास ते शरीरावर पसरविल्यास तुम्हाला डांस चावणार नाहीत.

4. लेमनग्रास आणि लवंग तेल लावावे

काही लेमनग्रासच्या पानांना खोबरेलतेलात लवंग सोबत टाकून हे मिश्रण शिजविण्यात यावे आणि हे तेल आपल्या शरीरावर लावल्यास तुमच्या जवळ डांस किंवा मच्छर फिरकणार नाहीत. हे तेल तुमच्या त्वचेसाठी देखील उत्तम असल्याने तुमती स्कीन चांगली होईल, तसेच अनेक प्रकारच्या स्कीन इन्फेक्शन पासून देखील सुटका मिळेल. मच्छर आणि डासांचा प्रादुर्भाव घरच्या घरी कमी खर्चात दूर करण्याचे हे उपाय कमी खर्चिक आहेत.

तसेच डासांना मारण्यासाठी कॉईल, मस्कीटो रिपेलेन्ट, क्रिम देखील बाजारात मिळतात. हल्ली चायनीझ अगरबत्ती देखील बाजारात मिळते.

( हा लेख केवळ सर्वसामान्य माहितीसाठी, हे उपाय वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला विचारात घ्यावा )