नांदेड | कोणत्याही आजाराचे लवकरच निदान झाल्यास तो बरा होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. या तत्त्वानुसार, नांदेड जिल्ह्यात (Nanded District) फिरते एंडोस्कोपी रुग्णालय (Endoscopy) सुरु करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात कँसरच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. मात्र कँसरचे (Cancer) निदान पहिल्या टप्प्यात झाल्यास अशा रुग्णांना नवे जीवन मिळण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच नांदेडमधील गॅलेक्सी हेल्थकेअर फाउंडेशनच्या वतने नांदेडमध्ये एक फिरते एंडोस्कोपी रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये हे रुग्णालय फिरणार असून यात दुर्बिणीद्वारे पचनसंस्थेची इंडोस्कोपी केली जाते. तरुण वयात पचन संस्थेच्या मार्गात कँसरच्या गाठी तयार होतात, त्याचं लवकर निदान होण्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त असल्याचं रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन जोशी यांनी सांगितलं. नांदेडमधील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयातील संचालक डॉ. नितीन जोशी म्हणाले, ‘ नांदेड हा आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणाच्या बॉर्डरवरचा जिल्हा असल्याने येथे सीमावर्ती भागातील अनेक तरुण आरोग्य सुविधांच्या अभावात असतात. अशा रुग्णांसाठी विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांसाठी गॅलेक्सी रुग्णालयातून आमचा स्टाफ दर रविवारी ही सुविधा पुरवत आहोत. राज्याच्या ग्रामीण भागातील हे पहिल्याच प्रकारचे फिरते एंडोस्कोपी रुग्णालय आहे, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन जोशी यांनी दिली.
नांदेडमध्ये सुरु झालेल्या या मोबाइल एंडोस्कोपी रुग्णालयात अत्यंत कमी दरात एंडोस्कोपीची सुविधा देण्यात आली आहे. गावातील रुग्णांना ऑन द स्पॉट रक्ततपासणी आणि फक्त 1500 रुपयांना एंडोस्कोपी करून मिळेल. इतर ठिकाणी उच्च दर्जाच्या एंडोस्कोपीसाठी पाच हजार रुपये ते वीस हजार रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाते. मात्र ग्रामीण भागातील रुग्णांसाठी गॅलेक्सी संस्थेमार्फत ही सुविधा अत्यल्प दरात पुरवण्यात आली आहे. 30 ते 60 वयातील अनेकजणांना तोंड अन्ननलिका, जठर, लहान आतड्यांचा कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे.. या सुविधेमुळे लवकर निदान होऊन कॅन्सर मुक्त जीवन जगता येते, अशी माहिती फिरते एंडोस्कोपी रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन जोशी यांनी दिली आहे.
एंडोस्कोपी म्हणजे तोंडातून एक दुर्बिण आतड्यात फिरवली जाते. या प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साइड या वायूने पोट फुगवलं जातं एका प्रकाशझोताद्वारे पोटाच्या आतील भागातील निरीक्षण केलं जातं. यात काही बिघाड आढलल्यास उपचारही केले जातात.
इतर बातम्या-