National Walking Day 2023 : रोज फक्त 20 मिनिटांची फेरी, हार्ट ॲटॅकची जोखीम दूर करी ! चालण्याचे अनोखे फायदे जाणून तर घ्या

| Updated on: Apr 05, 2023 | 3:39 PM

दरवर्षी एप्रिल महिन्यातील पहिल्या बुधवारी साजरा केला जाणारा हा दिवस 2007 साली अमेरिकन हार्ट असोसिएशनने सुरू केला होता. शारीरिक हालचालींद्वारे लोकांना निरोगी राहण्यासाठी जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

National Walking Day 2023 : रोज फक्त 20 मिनिटांची फेरी, हार्ट ॲटॅकची जोखीम दूर करी  ! चालण्याचे अनोखे फायदे जाणून तर घ्या
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : नॅशनल वॉकिंग डे (National Walking Day 2023) च्या माध्यमातून जगभरातील लोकांना चालण्याबाबत जागरूक केले जाते. चालण्याचे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक फायदेही (physical and mental benefits of walking) आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने, मग ती लहान मुलं असोत व मोठी माणसं अथवा वृद्ध नागरिक, प्रत्येकाने दिवसातून कमीत कमी 20 मिनिटे चालणे (20 minutes of walking) आवश्यक आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यातील पहिल्या बुधवारी साजरा केला जाणारा हा दिवस 2007 साली अमेरिकन हार्ट असोसिएशनने सुरू केला होता. शारीरिक हालचालींद्वारे लोकांना निरोगी राहण्यासाठी जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

चालण्याचे महत्त्व सांगणाऱ्या या खास दिवसानिमित्त आपण चालण्याचे फायदे जाणून घेऊया. फक्त 20 मिनिटांच्या चालण्याने तुम्ही हृदयविकाराच्या जोखमीसह इतर कोणत्या आरोग्य समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता, तेही समजून घेऊया.

चालण्यामुळे हृदयाशी निगडीत समस्या राहतात दूर : संशोधन

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, जर तुम्ही आठवड्यातून 4 तास चालण्यात घालवले तर हृदयविकारासह अनेक आजारांचा धोका कमी होतो. भारतात हृदयरुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि त्यामुळे दररोज चालणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार, चालण्याच्या चांगल्या सवयीमुळे हृदयाच्या समस्यांमुळे हॉस्पिटलमध्ये जावं लागण्याचा धोका कमी होतो.

दररोज चालण्याचे आहेत अनेक फायदे

डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते, जे लोक रोज चालतात त्यांच्या रक्तदाबाची पातळी अर्थात ब्लड प्रेशर लेव्हल नियंत्रणात राहते. खरंतर , फेरफटका मारल्याने शिरांमधील गोठलेल्या चरबीची पातळी कमी होऊ लागते. रक्तप्रवाह बरोबर असताना रक्तदाबाचा त्रास होत नाही.

रोज काही मिनिटे चालल्याने शरीर सक्रिय आणि ताजेतवाने वाटते आणि मनही कामात गुंतलेले असते.

असे म्हटले जाते की ज्यांना हेवी वर्कआउट किंवा जिम रूटीन पाळता येत नाही अशा लोकांना हळू चालण्याची सवय लावावी. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासोबतच त्वचेलाही याचा फायदा होतो.