Navratri 2023 : नवरात्रीत का केले आते सात्विक भोजन? असे आहे याचे महत्त्व

| Updated on: Oct 18, 2023 | 10:15 AM

सात्विक अन्न खाल्ल्याने मन शुद्ध, स्वच्छ आणि उर्जेने परिपूर्ण होते. या आहाराचे पालन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. सात्विक अन्नामध्ये विशेषतः कच्च्या भाज्या आणि फळांचा समावेश होतो.

Navratri 2023 : नवरात्रीत का केले आते सात्विक भोजन? असे आहे याचे महत्त्व
सात्विक भोजन
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) सुरुवात झाली आहे. या काळात सात्विक अन्न ग्रहण करण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक, या अन्नामध्ये फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, संपूर्ण धान्य यांचा समावेश होतो. त्यात तळलेले किंवा मसालेदार अन्न  नसते. सात्विक अन्न खाल्ल्याने मन शुद्ध, स्वच्छ आणि उर्जेने परिपूर्ण होते. या आहाराचे पालन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. सात्विक अन्नामध्ये विशेषतः कच्च्या भाज्या आणि फळांचा समावेश होतो. ज्यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स भरपूर असतात. हा आहार नियमितपणे पाळल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक गंभीर आजारांपासून दूर राहता येते. चला तर मग जाणून घेऊया सात्विक अन्नाचे फायदे.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

नवरात्रीमध्ये सात्विक अन्नामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासाठी नवरात्रीच्या उपवासात प्रथिनेयुक्त शेंगा आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. जे संसर्गाशी लढण्यास मदत करते. याशिवाय फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, जे नैसर्गिकरित्या शरीराचे संरक्षण करतात.

वजन कमी करण्यास उपयुक्त

सात्विक अन्नामध्ये लोकं अधिक हंगामी फळे आणि भाज्या खातात. ज्यामध्ये कार्बोहायड्रेडचे प्रमाण कमी असते आणि कॅलरीजही कमी आढळतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सात्विक अन्न तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये कमी कॅलरी असलेले पदार्थ तुम्हाला मदत करू शकतात. तसेच, सात्विक अन्नात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे खाल्ल्याने तुम्ही दीर्घकाळ पोटभर राहतो आणि तुम्ही जास्त खाणे टाळता, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

शरीराला ऊर्जा देते

जर तुम्ही नियमितपणे सात्विक अन्न खाल्ले तर तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. सात्विक आहाराचे नियम पाळल्यास थकवा आणि आळसाची समस्याही दूर होते.

शरीर डिटॉक्स करते

सात्विक अन्न खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारच्या समस्या टाळू शकता. जर तुम्हाला सूज येणे, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ येणे, थकवा येणे, पुरळ येणे इत्यादी समस्या असतील तर सात्विक अन्न जरूर खा, त्याचा फायदा होऊ शकतो. शरीर डिटॉक्स करण्यासाठी रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि मध मिसळून प्या. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.