झोपण्यापूर्वी ‘हे’ पदार्थ खाल तर हमखास वाढेल वजन, रहा सावधान !

| Updated on: Feb 22, 2023 | 3:27 PM

आपण जे अन्न खातो ते आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करते, परंतु चुकीचा आहार लठ्ठपणासह अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो. रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ टाळावेत, ते जाणून घेऊया.

झोपण्यापूर्वी हे पदार्थ खाल तर हमखास वाढेल वजन, रहा सावधान !
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : रात्री उशिरापर्यंत जागणे आणि काहीतरी खात रहाणे हे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. ही सवय मेटाबॉलिज्मला (metabolism) हानी पोहोचवते आणि शरीराला सतत थकवा जाणवू लागतो. तज्ज्ञांच्या मते, स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी (fit and healthy) ठेवण्यासाठी रात्रीच्या जेवणात नियमित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय असे काही पदार्थ आहेत जे रात्री झोपण्यापूर्वी खाणे टाळावे. जर तुम्ही रात्रीच्या वेळी तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करत असाल (Foods to avoid before bedtime) तर सावध व्हा.

याबद्दल त्जज्ञ सांगतात की प्रत्येक व्यक्तीची अन्नाची गरज वेगवेगळी असते. वजन कमी करण्यासाठी आपण रात्रीचे जेवण वगळावे, असा एक गैरसमज आहे. रात्रीच्या वेळी आपण कोणतीही क्रिया करत नसलो तरी आपले शरीर आपले कार्य सतत करत असते. खरंतर शरीरात रक्त प्रवाह सतत चालू असतो. याशिवाय फुफ्फुस आणि मेंदूही आपले कार्य करत असतात. अशा वेळी आपल्या शरीराला कॅलरीज बर्न करण्यासाठी ऊर्जेची गरज असते.

रात्री हे 6 प्रकारचे पदार्थ खाल्ल्यास वाढेल तुमचे वजन

हे सुद्धा वाचा

1) तेलकट, तळलेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ

रात्री खूप तळलेले पदार्थ खाणे टाळा. याशिवाय चीज, रेड मीट, बर्गर आणि पिझ्झा खाणे टाळावे. हे अन्न जितके चवदार असते तितकेच ते कॅलरीजनी भरलेले असेल. त्यांना पचायला वेळ लागतो, त्यामुळे अपचनाची समस्या सुरू होते. अशावेळी रात्री असे पदार्थ खाणे टाळावे.

2) ॲसिडिक आणि मसालेदार पदार्थ

जर अन्नामध्ये जास्त तेल आणि मसाले असतील तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. वास्तविक, अन्नामध्ये वापरण्यात येणारे जास्त मसाले आणि आंबट पदार्थ हे पोटदुखी आणि ॲसिड रिफ्लेक्सचे कारण बनतात. यामुळे रात्री पूर्ण व शांत झोप लागत नाही.

3) गॅस फॉर्मिंग फूड

रात्री झोपण्यापूर्वी बेसनयुक्त पदार्थ, काळे हरभरे, ब्रोकोली, राजमा, हरभरा, कोबी आणि फ्लॉवर असे पदार्थ खाल्ले तर ते पचायला वेळ लागतो. पूर्ण पचन न झाल्यामुळे गॅसेसच्या समस्या उद्भवू लागतात.

4) हाय फायबर फूड

उच्च फायबरयुक्त अन्न आपल्या शरीराला फायदेशीर ठरते. फायबर युक्त अन्न म्हणजे फळे, सॅलड्स, स्प्राउट्स आणि शेंगा आपल्या शरीराला मजबूत करतात. पण जर तुम्ही ते नाश्त्यात खाल्ले तर ते तुमच्या शरीराला पोषक बनवण्याचे काम करतात. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ते खाल्ले तर ते पोटदुखीचे कारण ठरू शकतात.

5) कॉफी

कॉफी फायदेशीर असली तरी रात्रीच्या वेळी ती पिणे हानिकारकही ठरू शकते. वास्तविक, रात्रीच्या जेवणानंतर कॉफी प्यायल्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्ही अधिक सतर्क राहता. अशा परिस्थितीत तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

6) मद्यपान

रात्री जास्त द्रवपदार्थ घेतल्याने वारंवार लघवीला जाण्याची समस्या कायम राहते. अशा स्थितीत रात्री ज्यूस, अल्कोहोल आणि इतर पेये घेणे टाळावे.

कसा असावा रात्रीचा आहार ?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, घरी शिजवलेल्या ताज्या अन्नाचा आहारात समावेश असावा. रात्रीच्या जेवणात एक वाटी सूप, हिरव्या भाज्या, तृणधान्ये आणि कडधान्ये यांचा समावेश असावा ज्यामध्ये कॅलरीज कमी असतात व ते हेल्दी जेवण असते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.