मुंबईः ज्यांना मधुमेहाचा (Diabetes) त्रास असेल तर अशा रुग्णांसाठी अन्नाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच मधुमेह असता अशा रुग्णांना कोणते अन्न वरदान मानले जाते हे ही महत्वाचे असते. मधुमेह ही एक चयापचयाची प्रक्रिया आहे, त्याचा परिणाम रक्तातील साखरेवर होतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही (Blood Sugar Levels) मोठ्या प्रमाणात वाढते. रक्तातील साखरेची पातळी वाढत राहिली तर आहाराची काळजी घेणे महत्वाचे असते. तुम्ही किती कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खात आहात याची विशेष काळजी घेणे महत्वाचे असते. कारण कार्बोहायड्रेट्सचा थेट रक्तातील साखरेवर परिणाम होतो.
रक्तातील ग्लुकोजची पातळी समप्रमाणात ठेवण्यासाठी असे अन्न खाणे आवश्यक आहे. ज्यामध्ये फायबर आणि पोषक तत्वे जास्त आहेत परंतु अस्वास्थ्यकर चरबी आणि साखर कमी आहे. ओट्स हे एक असेच अन्न आहे जे मधुमेह असणाऱ्यांसाठीही खाण्यास योग्य मानले जाते. ओट्सचे (Oats) जाडे भरडे पीठ किंवा ओट्स हे दोन्ही पदार्थ आहेत जे मधुमेह असणारी व्यक्ती कधीही मुक्तपणे खाऊ शकते.
ओट्स मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. यामुळे शरीरात हळूहळू साखर किंवा ग्लुकोज सोडले जाते, त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता जवळपास नगण्य असते. 100 ग्रॅम ओट्समध्ये 68 कॅलरीज आणि 21 ग्रॅम फायबर आढळतात.
याशिवाय, हे खाण्यासासाठीही खूप सोपे आहे, आणि ते विविध प्रकारे सेवन केले जाऊ शकते. त्याच्या गुणधर्मामुळे ओट्स शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देते. ओटस् हे पचनासाठीही उत्तम असे मानले जाते. त्याचबरोबर ओट्सच्या सेवनाने व्यक्तीचे वजनही नियंत्रणात राहत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
ओटस् या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी त्याची रोटी बनवता येते, त्या प्रकारे ती खाऊ शकता. हे खाताना तुम्हाला रोजच्या पेक्षा रोटी वेगळी वाटते, परंतु आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
ओटसपासून रोटी बनवण्यासाठी एक वाटी ओट्स, एक वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी कांदा, एक चमचा चिरलेली कोथिंबीर, २ चमचे मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी आणि तेलाचा वापर करा. आता सर्व साहित्य गव्हाच्या पिठात मिसळा आणि पीठ चांगले मळून घ्या. पिठात तेलाचा वापर केला तर ते चिकटणार नाही. हे पीठ 10 मिनिटे बाजूला ठेवल्यानंतर त्यापासून तुम्ही रोटी बनवू शकता.
संबंधित बातम्या
पन्नाशी ओलांडल्यानंतरही मिलिंद सोमणसारखं फिट राहायचंय? तर वाचा त्याने दिलेला हा लाखमोलाचा सल्ला
Urine Infection | महिलांनाच जास्त युरिन इन्फेक्शन का होते? ही घ्या कारणं अन् उपाय
Water | जास्त पाणी पिणेही आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या किती असावे प्रमाण