नवी दिल्ली: कोरोना विषाणूनं जगासमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. जगभरातील 8 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना संसर्ग झाला. जगभरात 16 लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. कोरोना विषाणूपासून रक्षण व्हावं म्हणून मास्कचा वापर करण्यात येतोय. मात्र, या मास्कची विल्हेवाट योग्य प्रकारे न लावल्यामुळे नवीन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जगभरातील 156 कोटी अधिक वापरलेले मास्क समुद्रात फेकून देण्यात आले आहेत. या मास्कमुळे पुढील काळात नवं संकट येऊ शकतं, असा अंदाज हाँगकाँगमधील पर्यावरणविषयक काम करणाऱ्या Oceans Asia संस्थेने वर्तवला आहे. ( 1.5 billion mask dumped in sea raised new problems to human being)
Oceans Asia संस्थेच्या अहवालानुसार 2020 मध्ये 52 अब्ज सिंगल युज मास्क वापरले गेले असतील. त्यापैकी 3 टक्के म्हणजेच 156 कोटी मास्क समुद्रामध्ये फेकण्यात आले.
सिंगल युज मास्कमध्ये प्लॉस्टिकचाही वापर केला जात. त्यामुळे या मास्कचा वापर दुसऱ्यांदा करता येत नाही. दुसऱ्यांदा मास्क वापरताना संसर्गाची भीती देखील कायम राहते. कचरा व्यवस्थापनामधील चुकीच्या पद्धतीमुळे समुद्रामध्ये 6800 टन प्लास्टिक प्रदूषण वाढणार आहे. या कचऱ्याचे तुकड्यांमध्ये रुपांतर होण्यास 450 हून अधिक वर्ष लागू शकतात.
समुद्रात प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण वाढलंय त्यामध्ये मास्क समुद्रात फेकल्यानं आणखी संकट निर्माण झालं आहे. मास्क मधील मायक्रो प्लास्टिक आणि नॅनो प्लास्टिकमुळे समुद्रातील सजीवांना धोका उत्पन्न होऊ शकतो. समुद्रातील सजीवांचा मृत्यू मास्कमुळे झाल्याचे समोर आलं आहे. काही माशांचा मास्कच्या दोरीत अडकून मृत्यू झालाय तर काही माशांच्या पोटामध्ये मास्क आढळले आहेत.
Oceans Asia संस्थेच्या अहवालामध्ये धुता येणाऱ्या आणि वारंवार वापरता येणाऱ्या मास्कचा वापर करावा, असं सुचवण्यात आलंय आहे. ब्रिटनच्या रॉयल सोसायटीनं प्राण्यांच्या सुरक्षेसाठी मास्क फेकण्यापूर्वी कानाला लावण्यात येणारी स्ट्रीप काढून टाकण्याचं आवाहन केलं होतं.
#COVID19: Total 20 UK returnees to India have tested positive for the new COVID strain so far
— ANI (@ANI) December 30, 2020
दरम्यान, भारतात नव्या कोरोना विषाणूचे 20 रुग्ण आढळूण आले आहेत. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान भारतात आलेल्या 33 हजार नागरिकांपैकी 20 जणांना नव्या कोरोनाची लागण झाली आहे.
संबंधित बातम्या:
कोरोनाची लस घेतल्यावर तब्येत बिघडली तर, जबाबदारी सरकार घेणार की कंपनी?
कोरोनावरील लस ब्रिटन आणि द. आफ्रिकेत आढळलेल्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी : आरोग्य मंत्रालय
तुमच्यापर्यंत लस कशी पोहोचणार, वॅक्सिनचा साठा ते लसीकरण 4 राज्यात रंगीत तालीम
( 1.5 billion mask dumped in sea raised new problems to human being)