Oral Care : तुमच्या दातांसाठी योग्य ब्रश कोणता? जाणून तर घ्या.. फॉलो करा ‘या’ हेल्थ टिप्स

| Updated on: Feb 08, 2023 | 9:39 AM

मधुमेह, हृयाशी संबंधित आजार यापासून वाचण्यासाठी आपल्या आरोग्याप्रमाणे मौखिक आरोग्याचीही योग्य काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत.

Oral Care : तुमच्या दातांसाठी योग्य ब्रश कोणता? जाणून तर घ्या.. फॉलो करा या हेल्थ टिप्स
Image Credit source: Tv9
Follow us on

नवी दिल्ली – एक खरं स्मित हे हृदयातून येते, पण निरोगी हास्य (smile) हे निरोगी तोंडातून येते. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, परंतु तोंडाच्या आरोग्याकडे (oral health) अनेकदा दुर्लक्ष केले जाते. तो आपल्या शारीरिक आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. अनेक संशोधनांतून असं दिसून येतं की खराब तोंडी आरोग्यामुळे हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असे डॉक्टरांनी नमूद केले. तसेच अनेक संशोधने ही मधुमेह आणि हिरड्यांचे आजार यांच्यात थेट संबंध दर्शवतात. म्हणूनच तोंडाच्या आरोग्याची योग्य काळजी (proper oral care) घेणे खूप महत्वाचे आहे.

चांगल्या मौखिक आरोग्याची चिन्हे

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ज्याप्रमाणे खराब मौखिक आरोग्य संकेत देतात, त्याप्रमाणे चांगल्या मौखिक आरोग्याचीही काही लक्षणे दिसून येतात. जर तुमच्या दातांचा रंग पांढरा स्वच्छ असेल, हिरड्या गुलाबी आणि निरोगी दिसत असतील आणि फ्लॉस केल्यावर रक्त येत नसेल, श्वासाला दुर्गंधी येत नसेल आणि गरम किंवा थंड पदार्थ खाताना झिणझिण्या येत न,सतील, तर तुमचे तोंडाचे आरोग्य चांगले मानले जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

कसा टूथब्रश वापरावा ?

डॉक्टर सांगतात की, दात स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रिस्टल टूथब्रश आणि फ्लोराईडवर आधारित असलेल्या टूथपेस्टचा वापर करावा. तसेच दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलणे ही चांगली सवय आहे, यामुळे तोंडात कॅव्हिटी तयार होण्यास प्रतिबंध करता येतो.

ब्रशवर टूथपेस्टचे प्रमाण किती असावे ?

बहुतांश लोकांना दात घासताना ब्रशवर भरपूर टूथपेस्ट घेण्याची सवय असते, त्यामुळे तोंड अधिक स्वच्छ होईल असं त्यांना वाटतं. पण ही चुकीची संकल्पना आहे, कारण जास्त टूथपेस्ट वापरल्याने काहीही फायदा होत नाही. तुम्ही फक्त एका मटाराच्या दाण्याच्या आकाराची टूथपेस्ट वापरली तरी ती पुरते व तोंड आणि दात स्वच्छ होतात.

हे पदार्थ दातांना चिकटत नाहीत

दातांमध्ये उरलेल्या अन्नामुळे कॅव्हिटी होऊ शकते, दात किडू शकतात. म्हणूनच डॉक्टर कुरकुरीत फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात. हे पदार्थ नीट चावून खाल्ले तर ते दातांमध्ये विशेष अडकून रहात नाहीत.

या ओरल हेल्थ टिप्सकडे द्या लक्ष

– दर 6-8 महिन्यांनी दंतवैद्याकडून तपासणी करून घ्या.

– गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका.

– दिवसातून दोनदा ब्रश आणि फ्लॉस करा आणि जीभ स्वच्छ करायला विसरू नका.

– कोणताही पदार्थ खाल्ल्यास, प्रत्येक वेळेस तुमचे तोंड स्वच्छ धुवा.

– कोणत्याही स्वरूपात तंबाखूचा वापर टाळा.

– तीक्ष्ण वस्तू हिरड्या आणि दातांपासून दूर ठेवा. अन्यथा गंभीर इजा होऊ शकते.