नवी दिल्ली : निरोगी राहण्यासाठी सकस आहार, व्यायाम यासोबतच पुरेशी झोपही (getting enough sleep) खूप महत्त्वाची आहे. चांगली झोप आपल्याला निरोगी तर ठेवतेच, पण आपले मनही ताजेतवाने करते. निरोगी जीवनशैलीसाठी, प्रत्येक व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की झोपेच्या कमतरतेमुळे माणसाला अनेक समस्या (health problems) उद्भवू लागतात. पण तुम्हाला माहित आहे का की कमी झोपच नव्हे तर गरजेपेक्षा जास्त झोपणे (oversleeping) देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. वर्ल्ड स्लीप डे निमित्त जाणून घेऊया अधिक झोप घेण्याचे तोटे –
लठ्ठपणा
जर तुम्ही 8 किंवा 9 तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. खरंतर, जास्त झोपेमुळे शरीरातील सर्व क्रिया मंदावायला लागतात, ज्याचा पचनसंस्थेवरही परिणाम होतो आणि व्यक्ती लठ्ठपणाची शिकार होऊ लागते. भविष्यात हा लठ्ठपणा अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या झोपेची योग्य वेळ ठरवणे फार महत्वाचे आहे.
हृदय रोग
जास्त झोप घेण्यासंदर्भात केलेल्या अभ्यासतून अशी माहिती समोर आली आहे की, जे लोक जास्त झोपतात, त्यांना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो. एका संशोधनानुसार, जे लोक 9 तासांपेक्षा जास्त झोपतात त्यांना कोरोनरी हृदयरोगाचा धोका दुपटीने वाढू शकतो.
मधुमेह
तुम्हीही निर्धारित वेळेपेक्षा जास्त झोपत असाल तर त्यामुळे मधुमेह होऊ शकतो. खरंतर, बराच वेळ झोपल्यामुळे शारीरिक हालचाली खूप कमी होतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. 9 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होऊ शकते, असेही एका अभ्यासातून समोर आले आहे.
पाठदुखी
जर तुम्हाला जास्त वेळ पण्याची सवय असेल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. साधारणपणे ही समस्या अशा लोकांना जास्त असते, जे तासनतास कॉम्प्युटरवर काम केल्यानंतर बराच वेळ झोपतात. अशा स्थितीत लोकांना शारीरिक हालचालींसाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही आणि पाठीत वेदना होण्याचा त्रास सुरू होतो.
डिप्रेशन
जास्त वेळ झोपल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही अनेक समस्या निर्माण होतात. वास्तविक, जास्त झोपेमुळे सुस्ती आणि आळस वाढतो, ज्याचा मेंदूवर परिणाम होतो. जास्त वेळ झोपल्याने उत्साह कमी होतो तसेच सकारात्मकता कमी होते. त्यामुळे डिप्रेशनही येऊ शकते