नवी दिल्ली : आपल्याकडे आजही आजारी माणसाला असं म्हणतात की जरा गावच्या शुद्ध हवेत जाऊन या बरं वाटेल. गावी दिवसा तापमान वाढले तरी झाडाखाली बसलं तरी गार वाटतं आता तर संशोधनात असे पुढे आले आहे की, जी माणसं थंड हवामानात राहतात त्याचं आयुष्य उष्ण हवामानात राहणाऱ्यांपेक्षा जास्त असतं. संशोधकांना असं आढळलंय की थंड वातावरणात आपल्या मानवी पेशींवरील खराब प्रोटीन हटायला सुरूवात होते. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानूसार थंड हवा मानवाचे आयुष्य वाढविण्यासाठी उपकारक ठरली आहे.
जर्मन युनिव्हर्सिटी ऑफ कोलोजनच्या संशोधकांनी म्हटले आहे की दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी थंड वातावरण निर्णायकरित्या उपयुक्त सिद्ध झालं आहे. सिनोरहॅब्डाइटीस एलिजेन नावाचा किटक आणि मानवी पेशींवर एका प्रयोगशाळेत संशोधन करण्यात आले. यावेळी आढळले की सरासरी तापमान 15 डिग्री राहिल्यास पेशींचें खराब झालेले प्रोटीन हटायला लागते आणि त्याच्या जागी नविन प्रोटीन घेत. यास प्रोटीसम अॅक्टीवेअर संबोधण्यात आले. अशा अॅक्टीवेअरला PA28y/PSME3 नावाने ओळखण्यात आले. हे वाढत्या वयाला रोकते.
आजारांना पेशींतील खराब प्रोटीन जबाबदार
त्यासाठी अत्यंत टोकाचे थंड नव्हे तर किमान 15 ते 25 डीग्री असे आल्हाददायक तापमान गरजेचे असते. या निष्कर्षांच्या मदतीमुळे आता वाढते वय रोखण्याच्या या नव्या पर्यायांवर संशोधन सुरू होणार आहे. त्यामुळे डिमेंसिया, पार्किंनन्स आणि अल्झायमर्स सारख्या म्हातारपणी होणाऱ्या आजारांपासून मानवाची सुटका होण्याची शक्यता आहे. हे सर्व आजार न्यूरोडीजेनरेटीव डीसीज आहेत. ज्याला खराब प्रोटीन जबाबदार असते. त्यामुळे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे की भले तापमान भले कसेही असो परंतू ही प्रक्रीया कॉपी करून वय रोखता येईल का यावर विचार सुरू आहे.
पेशींची सेफ्टी वॉल काय करते
आपण म्हातारे का होतो ? हे देखील समजून घ्यायला पाहीजेत काही म्हणतात न्यूरॉन्स संपल्याने तर काही म्हणतात प्रोटीन संपल्याने म्हातरपण येतं. तर काही संशोधक डीएनए शी याचा संबंध जोडतात. पेशींच्या डीएनएत सापडणाऱ्या क्रोमोझोमच्या दोन्ही बाजूंना टेलीमियर नावाची सेफ्टी वॉल असते.
तर हे सुरक्षा कवच एकदमच नष्ट होते
जस-जशी पेशींची संख्या वाढते तशी त्यांचा संरक्षक पडदा घटून छोटा होत जातो. त्यातून म्हातारपणाची लक्षणे हळूहळू दिसू लागतात. जसे केस पांढरे होणे, त्वचेला सुरूकुत्या पडणे, दृष्टी कमजोर होणे आणि एकवेळ अशी येते की हे सुरक्षा कवच एकदमच नष्ट होते आणि मृत्यू जवळ येऊन ठेपतो..म्हातारपण आणि मृत्यूचे तसे निश्चित ठाम कारण अजूनही सापडलेले नाही.ही अवस्था अनेक कारणांनी मिळून झालेला परीणाम असू शकतो.