Piles: मुळव्याधीने त्रस्त आहात? मग ‘या’ पाच गोष्टींचे सेवन अवश्य करा

| Updated on: Dec 06, 2022 | 4:15 PM

मुळव्याधी हे अवघड जागेचे दुखणे आहे. यावर काही घरगुती उपाय केल्याने आराम मिळू शकतो.

Piles: मुळव्याधीने त्रस्त आहात? मग या पाच गोष्टींचे सेवन अवश्य करा
मुळव्याधी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  मूळव्याध (Piles) हा एक असा आजार आहे जो बहुतांश वेळा अवघड जागेचं दुखणं म्हणून ओळखला जातो. पण लाजेने किंवा फक्त निष्काळजीपणामुळे मुळव्याधाकडे (haemorrhoids) दुर्लक्ष केल्यास नंतर याचा गंभीर त्रास जाणवू शकतो. मुळव्याधाचे मुख्य कारण ठरते बिघडती जीवनशैली. आहार व व्यायाम याचा योग्य तो ताळमेळ न बसल्यास पचनाच्या समस्या उद्भवतात व यातूनच मूळव्याध सुरु होतो. आहारात अधिक तळलेल्या व प्रक्रिया केलेल्या अन्नाचा समावेश असल्यास पचनाची समस्या आणखीन वाढू शकते व यामुळे मूळव्याधही गंभीर होऊ शकतो.

या समस्येबाबत फार खुलेपणाने बोलले जात नसल्याने अनेकजण मूळव्याधीचा त्रास सहन करतात. मात्र यामुळे ही समस्या अधिक गंभीर होते. कालांतराने मूळव्याधीच्या वेदनादायी समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते. म्हणूनच हा त्रास अत्यंत गंभीर होऊ नये म्हणून सुरुवातीच्या टप्प्यावरच या आजाराकडे लक्ष देणं गरजेचे आहे. जाणून घेऊया मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करणे लाभदायक ठरेल.

ताक

मूळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी दिवसातून किमान एक लिटर ताक प्यावे. एकाच वेळेस इतके ताक पिणे शक्य नसल्याने थोड्या थोड्या कालावधीच्या अंतराने प्यावे. याशिवाय दिवसभरात किमान 3 लिटर पाणी अवश्य प्यावे. शरीरात पाण्याच्या कमतरतेने देखील मूळव्याधीचा त्रास वाढतो.

हे सुद्धा वाचा

केळ

दिवसातून एकदा किमान एक केलं खावे. केळामुळे पचन होण्यास मदत होते. शक्यतो रात्रीच्य वेळी केळ खाणे टाळावे. दिवस जेवण झाल्यानंतर खाल्यास फायदा होतो.

पपई

बद्धकोष्टतेमुळे देखील मूळव्याधीचा त्रास होतो. रात्री झोपताना पपईचे सेवन केल्यास अन्न पचन व्यवस्थित होते. याशिवाय पपईमुळे पोट साफ होते. पिकलेली पपई खाल्याने मूळव्याधीच्या वेदना कमी होतात.

त्रिफळा चूर्ण

जेवणानंतर अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण खाल्याने मूळव्याधीचा त्रास कमी होतो. त्रिफळा चूर्ण खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्रिफळा चूर्णामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

पेरू

हिवाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या फळांपैकी एक म्हणजे पेरू आहे. पेरू मूळव्याधीची समस्या असणाऱ्यांना विशेष लाभदायक ठरते.