नवी दिल्ली : आजकाल प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये (plastic bottle) पाणी पिणे अगदी सामान्य झाले आहे. लोक घरातून बाहेर निघताना, प्रवास करताना निर्भयपणे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पितात. बहुतांश लोक घरातही प्लास्टिकच्या बाटल्या पाणी पिण्यासाठी वापरतात. प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्या आरोग्यावर (health) तर वाईट परिणाम होतोच, पण त्यामुळे पर्यावरणाचेही खूप नुकसान होते. प्लास्टिकमध्ये फ्लोराईड, आर्सेनिक आणि ॲल्युमिनियमसारखी अनेक प्रकारची हानिकारक रसायने (harmful chemicals) आढळतात, जी आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात आणि त्यामुळे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात दरवर्षी 35 लाख टन प्लास्टिकचा कचरा (plastic waste) निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात लोकांना अनेक आजार होऊ शकतात.
मायक्रो प्लास्टिक असते घातक
प्लास्टिकच्या गोष्टी या अनेक हानिकारक केमिकल्सनी बनलेल्या असतात. जेव्हा प्लास्टिकची बाटली उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा ती पाण्यात सूक्ष्म प्लास्टिक सोडते. प्लास्टिकचे हे छोटे कण मानवी शरीराला खूप हानी पोहोचवतात. यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. जेव्हा त्यांचे शरीरातील प्रमाण वाढते तेव्हा हार्मोन्सचे असंतुलन, वंध्यत्व आणि यकृताशी संबंधित अनेक गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवतात. म्हणूनच प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा.
हृदयरोग आणि मधुमेहाचाही असतो धोका
प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने मनुष्याला हृदयविकार चटकन घेरतात, सोबतच अनेक जण मधुमेहा सारख्या आजारालाही बळी पडताना दिसतात. प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही वाईट परिणाम होतो. खरंतर प्लास्टिकमध्ये असलेली हानिकारक रसायने पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, तसेच अनेक आजारांचाही आपल्याला सामना करावा लागू शकतो.
पुरूषांच्या शूक्राणूंची संख्या होते कमकुवत
प्लास्टिकच्या बाटल्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या म्हणजेच स्पर्म काऊंट कमी होतो. तर मुली लवकर वयात येऊ शकतात. शुक्राणूंची संख्या केवळ प्रजननक्षमतेशी निगडीत नाही तर त्याचा पुरुषांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. शुक्राणूंची संख्या कमी झाल्यास टेस्टिक्युलर कॅन्सरसह (पुनरुत्पादक भाग) अनेक आजार होऊ शकतात. तसेच यामुळे पुरुषांच्या आयुर्मानावरही परिणाम होतो. वास्तविक, प्लास्टिकमधील हानिकारक रसायनांमुळे गर्भाशयाशी संबंधित आजार, स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो. जे लोक बाटलीबंद पाण्याचे सेवन करतात त्यांनाही यकृत आणि स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.