Health : चीनमध्ये पसरत चाललेल्या रहस्यमय आजारापासून भारतात वाचण्यासाठी करा हे उपाय

| Updated on: Nov 25, 2023 | 8:32 PM

Health : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त करण्याचं कारण म्हणजे निमोनियाचा सर्वाधिक परिणाम उत्तर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे चीन देशात अनेक शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत.

Health : चीनमध्ये पसरत चाललेल्या रहस्यमय आजारापासून भारतात वाचण्यासाठी करा हे उपाय
Fever
Follow us on

मुंबई : कोरोना सारख्या धोकादायक महामारीनंतर चीनमध्ये आता आणखी एक धोकादायक आजार निर्माण झाला आहे. या आजाराचा परिणाम लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. चीनमध्ये थैमान घालणाऱ्या या आजाराला निमोनिया म्हटलं जात आहे. या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त केली आहे.

या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त करण्याचं कारण म्हणजे निमोनियाचा सर्वाधिक परिणाम उत्तर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे चीन देशात अनेक शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे WHO नं चिंता व्यक्त करत भारतातील सर्व लोकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

चीनमध्ये पसरलेल्या निमोनियाचे लक्षण काय?

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये निमोनियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. तसंच ज्यांना उच्च ताप येतो, फुफ्फुसाला सूज येते, फुफ्फुसात वेदना होतात, दमा, कमकुवत प्रतिकारशक्ती ही निमोनियाची लक्षणे आहेत. तसंच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, रक्तदाबाचा त्रास आहे अशांना देखील निमोनियाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. निमोनियाचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये जास्त प्रमाणात पसरतो. तसंच भूक न लागणे, कफ, खोकला, छातीत दुखणे, खोकताना रक्तस्त्राव होणे ही देखील निमोनियाची लक्षणे आहेत.

निमोनियापासून असं करा स्वतःचं संरक्षण

कधीही बाहेर जाताना स्वतःला उबदार कपड्यांनी झाकून घ्या. जर तुम्ही धूम्रपान किंवा मद्यपान करत असाल तर ते करणं टाळा. पौष्टिक आहार घ्या. थंडीच्या या दिवसांमध्ये गरम पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन करा. बॅक्टेरियापासून स्वतःचे संरक्षण करा, यासाठी फ्लूची लस घ्या.