Busy Lifestyle मध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ योगासन करा ट्राय…

| Updated on: Feb 04, 2025 | 5:42 PM

Yoga Tips: निरोगी आरोग्यासाठी योग्य पोषक आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित राहातात आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. व्यायाम केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाते त्यासोबतच वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. व्यायाम केल्यास तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते.

Busy Lifestyle मध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हे योगासन करा ट्राय...
Follow us on

आजच्या व्यस्त जीवनशैलीत स्वत:साठी वेळ काढणे अत्यंत कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये लोक त्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी, शारीरिक हालचाल करणे महत्वाचे असते. निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम एक उत्तम पर्याय आहे. मात्र, आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे लोकांना व्यायामासाठीही वेळ मिळत नाही. त्यासोबतच आजकालच्या आहारामध्ये पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटिन, कॅल्शियम आणि कार्बोहायड्रेट्स या घटकांचा समावेश करा…

योग्य आहारासोबत तुमच्या जीवनशैलीमध्ये योगाचा समावेश केला पाहिजेल. दररोज सकाळी नियमित योगा केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत. निरोगी आहार आणि नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित होतात आणि तुमचं वजन देखील नियंत्रित राहाते. जास्त प्रमाणात तेलकट आणि जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन वाढू लागते. त्यामुळे आहारामध्ये तेलकट पदार्थांचा वापर करणं टाळा. चला तर जाणून घेऊया निरोगी आरोग्यासाठी कोणते योगासने फायदेशीर ठरतील.

ताडासन

दररोज सकाळी उठल्यावर ताडासनाचा सराव करावा यामुळे तुमच्या शरीरातील ताण कमी होतो आणि तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. ताडासन केल्यामुळे तुमच्या पायांना आराम मिळतो. ताडासन तरण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सरळ उभे राहा आणि तुमचे दोन्ही पाय जवळ ठेवा. त्याननंतर दीर्घ श्वास घेऊन तुमचे हाथ तुमच्या नमस्कार मुद्रामध्ये डोक्याच्या वर घेऊन जा. हा व्यायाम तुम्ही ५ ते ७ वेळा करू शकता.

हे सुद्धा वाचा

वृक्षासन

तुम्ही घरी, ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये, जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल आणि वेळ मिळेल तिथे वृक्षासन करू शकता. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहून एक पाय तुमच्या मांडीवर ठेवा आणि सरळ उभे राहाण्याचा प्रयत्न करा. या व्यायामामुळे तुमची एकाग्रता वाढते आणि तुमच्या शरीरामधील हार्मोन्स संतुलित रहातात.

हस्तपादासन

हस्तपादासन करण्यासाठी सरळ उभे राहा आणि हळू हळू पुढे वाकवा. आपल्या हातांनी आपल्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हे आसन तुम्ही कधीही करू शकता. हस्तपादासन केल्यामुळे तुमच्या कमरेचा आणि पोटाचा व्यायाम होतो. त्यासोबतच तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर तो दूर होण्यास मदत होते.