Pregnancy : महिलांनी गरोदरपणात ‘हा’ व्यायाम करावाच, मिळतील जबरदस्त फायदे!

| Updated on: Apr 15, 2023 | 5:22 PM

प्रत्येक वैवाहिक स्त्रिच्या आयुष्यात आई होण्यासारखा दुसरा आनंद कोणताच नसतो. पण जेव्हा कोणतीही स्त्री प्रेग्नंट राहते तेव्हा तिला स्वतःची आणि बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं.

Pregnancy : महिलांनी गरोदरपणात हा व्यायाम करावाच, मिळतील जबरदस्त फायदे!
Follow us on

Health News : प्रत्येक वैवाहिक स्त्रिच्या आयुष्यात आई होण्यासारखा दुसरा आनंद कोणताच नसतो. पण जेव्हा कोणतीही स्त्री प्रेग्नंट राहते तेव्हा तिला स्वतःची आणि बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तसेच प्रेग्नेंसीत व्यायाम करणंही खूप गरजेचं असतं. पण व्यायाम करतानाही काळजी घेण्याची गरज असते.

गर्भवती महिलांना कधीही हेवी एक्सरसाईज करण्याचा सल्ला दिला जात नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःची आणि बाळाची काळजी घेऊनच व्यायाम केला पाहिजे. महिलांनी प्रेग्नेंसीच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्येच फक्त एकच व्यायाम केला पाहिजे तो म्हणजे चालणे, स्त्रियांनी प्रेग्नेंसीत व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. पण व्यायाम करतानाही त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. चालण्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.  व्यायाम करतानाही त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे.

स्त्रियांनी प्रेग्नेंसीत अशा प्रकारे चालले पाहिजे की त्यांना आरामदायक वाटेल. तसेच चालताना तुम्ही आरामात बोलू शकता. पण चालताना दम लागेल अशा पद्धतीने चालू नये. जर चालताना दम लागल्यासारखं वाटत असेल तर लगेच थांबा.

चालण्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायामासारखे कार्य करते. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. तसेच चालण्याने तुमचा स्टॅमिना सुधारण्यास मदत होते. चालण्यामुळे प्रेग्नेंसीत वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.

प्रेग्नेंसीत चालण्याने पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. गरोदरपणात स्त्रियांना बद्धकोष्ठतेचा त्रास निर्माण होतो. पण चालण्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.  अशा परिस्थितीत चालणे खूप फायदेशीर ठरते.

प्रेग्नेंसीत चालण्याने तुमचा मूड सुधारण्यास मदत होते. दररोज चालल्याने तुम्हाला सकारात्मक वाटते. त्यामुळे तुम्हाला तणावापासून आराम मिळण्यास मदत होते. विशेष म्हणजे प्रेग्नेंसीत चालण्याने नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते. तसेच प्रेग्नेंसीत अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.  त्यामुळे चालण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.