प्लास्टिक बॉटलमधून पाणी पिणं विषासमान ! गर्भवती महिलांना सर्वात जास्त धोका

| Updated on: Mar 06, 2023 | 9:32 AM

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी न पिणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिण्याचा सर्वात मोठा धोका गर्भवती महिलांना आहे.

प्लास्टिक बॉटलमधून पाणी पिणं विषासमान ! गर्भवती महिलांना सर्वात जास्त धोका
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : जल हे जीवन आहे, असे आपण सर्वजण म्हणतोच. पुरेशा प्रमाणात पाणी पिणे (drinking enough water) हे आरोग्यासाठी फायदेशीर असते, त्यामुळे शरीरातील कार्य व्यवस्थित सुरू राहतात. पण ते पाणी आपण कसे आणि कशातून पितो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अनेक लोकं प्लास्टिकच्या बाटलीतून (plastic bottle) पाणी पितात, पण प्लॅस्टिकचे छोटे कण आपल्या आरोग्यासाठी खूप घातक (harmful for health) ठरू शकतात. म्हणूनच काचेच्या किंवा धातूच्या बाटल्यांमधून पाणी किंवा इतर पेये पिण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. रोम टोर वर्गाटा विद्यापीठातील हिस्टोलॉजी आणि भ्रूणविज्ञान या विषयातील तज्ज्ञ डॉ. लुईसा कॅम्पानोलो यांनी असा इशारा दिला आहे की लहान प्लास्टिकच्या कणांमुळे मानवी टिश्यूजना (human tissues) धोका पोहोचू शकतो. यापूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले होते की प्लास्टिकचे सूक्ष्म कण मानवी रक्तप्रवाहात आणि नाळेमध्येही प्रवेश करू शकतात.

पण अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या वार्षिक परिषदेत उंदरांवरील एका नव्या अभ्यासाची माहिती देण्यात आली. या संशोधनानुसार प्लास्टिकचे छोटे कण गर्भवती महिलांचा गर्भ नष्ट करू शकतात. गर्भ हे प्लास्टिकच्या कणांचे टार्गेट असू शकतात, असे संकेत दिसत असल्याचे असे डॉ. लुईसा यांनी नमूद केलं.

मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय ?

हे सुद्धा वाचा

मायक्रोप्लास्टिक्स हे 0.2 इंच (5 मिमी) पेक्षा कमी व्यासाचे प्लास्टिकचे छोटे तुकडे असतात. याशिवाय प्लास्टिकचे काही सूक्ष्म कण इतके लहान असतात की ते उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत. तज्ञांच्या मते, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर विल्हेवाट लावलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या त्यांचे डेब्रिस रिलीज करून शकतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुससार, प्लास्टिकच्या बाटलीत खूप वेळ पाणी ठेवले जाते. ते पाणी एखाद्या व्यक्तीने प्यायल्यास, त्या व्यक्तीला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळेच प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी न पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

संशोधनात काय आढळले ?

न्यू जर्सी येथील रुटगर्स युनिव्हर्सिटीतील पर्यावरण आणि नॅनोसायन्स बायोइंजिनियरिंगचे तज्ज्ञ डॉ.फिलीप यांच्या मते, प्राण्यांवर केलेले हे संशोधन खरोखरच चिंताजनक आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या एका संशोधनानुसार, 24 तासांनंतर, गर्भवती प्राण्याच्या नाभीमध्ये सूक्ष्म- आणि नॅनो-प्लास्टिक आढळले. एवढेच नाही तर गर्भाच्या प्रत्येक भागात हे प्लास्टिकचे कण आढळून आले. डॉ. फिलिप म्हणतात की प्रत्येक व्यक्ती दर आठवड्याला सुमारे 5 ग्रॅम सूक्ष्म- आणि नॅनो-प्लास्टिक वापरतो, हे चिंताजनक आहे.