वॉशिंग्टन : कोरोनाचा प्रसार (corona) आता परत वेगाने सुरू झाला आहे. संशोधक सुरुवातीपासूनच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या परिणामांवर (effects of corona on body) दावे करत आहेत. हळूहळू त्यांचे म्हणणे खरे ठरत आहे. अमेरिकेतील कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलांच्या मुलांच्या मेंदूचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिला गर्भवती (pregnant ladies) असताना त्यांना कोविडची लागण झाली होती आणि संसर्ग प्लेसेंटामध्ये पसरला होता.
पीडियाट्रिक्स जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित झाला आहे, ज्यामध्ये मियामी विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की मुलांच्या मातांना दुसऱ्या तिमाहीत संसर्ग झाला होता. 2020 मध्ये, लस सुरू होण्यापूर्वी त्या महिलेला डेल्टा प्रकाराची लागण झाली होती, जेव्हा कोविडचा संसर्ग शिखरावर होता. संशोधकांनी दावा केला की, मुलांना जन्मावेळी फेफरं आलं होतं आणि नंतर त्यांच्यामध्ये काही तक्रारीही दिसून आल्या.
एका बाळाचा 13 व्या महिन्यात झाला मृत्यू
या दोन बाळांचा ब्रेन डॅमेज झाला होता, त्यापैकी एका मुलाचा 13 व्या महिन्यांत मृत्यू झाला, तर दुसऱ्या बाळाला हॉस्पिस केअरमध्ये ठेवण्यात आले. मियामी विद्यापीठातील बालरोगतज्ञ आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. मर्लिन बेनी यांनी सांगितले की, कोणत्याही मुलांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्याच्या शरीरात कोविड अँटीबॉडी आढळून आली. संशोधकांनी सांगितले की यावरून असे सूचित होते की संसर्ग गर्भवती महिलांच्या नाळेमध्ये आणि नंतर मुलांमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे मुलांच्या मेंदूलाही इजा होऊ शकते.
आईच्या प्लेसेंटामध्ये आढळला कोरोना विषाणू
संशोधकांच्या सांगण्यानुसार, मुलांना जन्म देणाऱ्या महिलांच्या प्लेसेंटामध्ये संसर्ग झाल्याचे पुरावे आढळून आले आहेत. मुलांच्या मेंदूमध्येही विषाणूच्या खुणा आढळल्या, ज्यावरून असे सूचित होते की या संसर्गामुळेच मेंदूचे नुकसान झाले आहे. या महिलांनी गरोदर असताना कोरोना चाचणी केली होती, ज्यामध्ये त्या पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आढळून आली होती.
गर्भवती महिलांना तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
कुटुंब नियोजन करणाऱ्या महिलांना संशोधकांनी एक महत्वपूर्ण सल्लाही दिला आहे. अशी प्रकरणे दुर्मिळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मियामी विद्यापीठातील स्त्रीरोगतज्ञ डॉ शहनाज दुआरा यांनी कोरोनाच्या काळात गर्भवती महिलांना सल्ला दिला आहे की त्यांनी आपल्या मुलांना बालरोगतज्ञांना दाखवावे. मुलामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार आढळल्यास ती 7-8 वर्षांत बरी होऊ शकते.