मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology) बॉम्बेमधील काही संशोधकांनी स्वस्त दरातील बँडेज (Bandage) विकसित केले आहे. या बँडेजचे वैशिष्ट म्हणजे हे बँडेज द्विस्तरीय आहे. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल (Anti-bacterial), अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यामुळे जखम लवकर भरून निघण्यास मदत होते असा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमधील प्रा. प्रकृति तायलिया आणि त्यांच्या टीमने हे संशोधन केले आहे. याबाबत बोलताना प्रकृति तायलिया यांनी म्हटले आहे की, आम्ही अगदी स्वस्त दरातले बँडेज विकसित केले आहेत. जे द्विस्तरीय आहे. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. या गुणधर्मांमुळे जखम लवकर भरून निघण्यास मदत होते. तसेच हे पूर्णपणे सुरक्षीत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना प्रकृति तायलिया यांनी म्हटले आहे की, आम्ही जी मलमपट्टी विकसित केली आहे, ती पॉलिमर आधारित द्विस्तरीय मलमपट्टी आहे. ही मलमपट्टी जुनाट आणि ज्यांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत अशा लोकांसाठी देखील फायद्याची ठरणार आहे. या मलमपट्टीमध्ये विविध प्रकारचे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यामुळे जखम लवकर भरून निघण्यास मदत होईल. आम्ही या उत्पादनाच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. आम्ही आमच्या या प्रोडक्टचा लवकरच व्यवसाय सुरू करणार आहोत. ही मलमपपट्टी बुहगुणी आहे सोबोतच ती अगदी अल्पदरात आम्ही ग्राहकांना उपलब्ध करू देणार असल्याचे तायलिया यांनी सांगितले.
ही मलमपट्टी सामान्य मलमपट्टीच्या आकाराचीच आहे. मात्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमधील संशोधकांनी विकसित केलेल्या या बँडेजमध्ये असे काही गुणधर्म आहेत, जे या बँडेजला इतर बँडेजपेक्षा वेगळे बनवतात. यामध्ये विविध प्रकारचे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे जखम लवकर भरून निघते. तसेच ही मलमपट्टी द्विस्तरीय असल्यामुळे जखमेला आराम मिळतो. जखमेचा दाह कमी होण्यास मदत होते. तसेच जखम लवकर भरून निघते.