Health : तुम्हाला माहित नसेल पण जेवण किती प्रमाणात खायचं याचेसुद्धा आहेत नियम, जाणून घ्या!

| Updated on: Oct 17, 2023 | 10:41 PM

काही वेळा अन्न देखील तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरतं. तर आता आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी अन्नाच्या काही पद्धती आणि नियम याबाबत जाणून घ्या.

Health : तुम्हाला माहित नसेल पण जेवण किती प्रमाणात खायचं याचेसुद्धा आहेत नियम, जाणून घ्या!
उपवास असताना खूप भूक लागते. थोड्या-थोड्या अंतराने काहीतरी खात राहा. सतत काही ना काही खाल्ल्याने भूक कमी लागते. भूक लागली नाही की उपवास देखील मोडत नाही. दर दोन तासाने काही ना काही खात राहा. बराच वेळ काहीच खाल्लं नाही तर डोकेदुखी, थकवा जाणवू शकतो.
Follow us on

मुंबई : सध्याच्या काळात आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचं असतं. कारण आपण काय खातो यावर आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी अवलंबून असते. जर तुम्ही पौष्टिक आहार नाही घेतला तर तुमच्या शरीरातील कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाने पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या खाण्याच्या सवयी देखील योग्य असणे गरजेचे आहे. परंतु बहुतेक लोकांना अन्न खाण्याच्या योग्य पद्धती, नियम माहिती नसतात.

अन्न खाण्याची देखील एक योग्य पद्धत असते आणि ती माहिती असणे प्रत्येकाला खूप गरजेचे आहे. जेवण करताना आणि जेवणानंतर काय गोष्टींची काळजी घ्यावी हे माहिती असणं गरजेचे आहे. तर प्रत्येकाने जेवण करण्यापूर्वी तीस मिनिटे आधी पाणी प्यावं. तसेच जेवताना पाणी पिऊ नये आणि जेवताना टीव्ही किंवा मोबाईल देखील पाहू नये. तसेच जेवताना नेहमीच जमिनीवर बसून जेवावे, अन्न हे घाई घाईने खाऊ नये जर तुम्ही घाईघाईने जेवला तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तसेच जेवणानंतर तुम्ही अर्धा किंवा एक तासानंतर पाणी पिऊ शकता.

तुमच्या जेवणाच्या ताटात नेहमी संतुलित आहार असणे गरजेचे आहे. जेवताना तुमच्या ताटात जास्तीत जास्त भाज्या असणे गरजेचे आहे. कारण भाज्यांमध्ये जीवनसत्वे, फायबर, प्रोटीन असे अनेक घटकांचे स्त्रोत असतात. तसेच तुमच्या ताटामध्ये डाळीचा समावेश करा कारण डाळीमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. त्यानंतर भात, रोटी, कोशिंबीर या पदार्थांचा समावेश करा यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि फायबर देखील मिळते. तसेच एक गुळाचा तुकडा देखील तुमच्या ताटात असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला अन्नपचन होण्यास मदत होते.

अन्न खाण्याची एक योग्य वेळ असते आणि ती वेळ प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत नाश्ता करणे गरजेचे असतं. त्यानंतर दहा ते बारा या वेळेमध्ये एखादं फळ खावं, तसेच दुपारी एक ते दोन या वेळेमध्ये प्रत्येकाने जेवण केलं पाहिजे. त्यानंतर चार वाजता चहा किंवा नाश्ता करणे गरजेचे आहे आणि रात्री सात ते आठ या वेळेत जेवण करणं गरजेचं असतं.