Ayushman Bharat : 70हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या डॉक्युमेंटशिवाय लाभ मिळणं कटकटीचं! आताच समजून घ्या

| Updated on: Dec 03, 2024 | 1:00 PM

आयुष्मान भारत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची योजना आहे. कारण या वयातच सर्वाधिक औषधं आणि उपचारांवर खर्च होतो. अनेकदा हा खर्च पाहूनच कौटुंबिक पातळीवर कलह होतात. तसेच पैशांअभावी उपचार अर्धवट सोडून देण्याची वेळ येते. पण आयुष्मान भारत योजनेमुळे अशी परिस्थिती ओढावणार नाही. पण तुमच्याकडे फक्त एक डॉक्युमेंट असणं खूपच गरजेचं आहे.

Ayushman Bharat : 70हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या डॉक्युमेंटशिवाय लाभ मिळणं कटकटीचं! आताच समजून घ्या
Follow us on

देशात 70 पेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरु झाली आहे. या योजनेचा लाभ 70हून अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. यासाठी उत्पन्नाचं कोणतंही पॅरामीटर नाही. पण जे नागरिक राज्य किंवा केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झाले आहेत. तसेत त्यांना CGHS/SGHS, ECHS, ESCI आरोग्यसेवेचा लाभ मिळत असेल. तर त्यांना जुन्या आरोग्य सेवेचा लाभ सुरु ठेवायचा की आयुष्मान भारत योजना निवडायची यापैकी एक काय ते ठरवावं लागेल. या योजनेसाठी कधीही अर्ज करू शकता. यासाठी पहिल्यांदा नाव नोंदणी करणे गरजेचं आहे. पण यासाठी आधारकार्ड आवश्यक कागदपत्र आहे. कारण आधारकार्डशिवाय तुम्ही अर्ज करू शकणार नाहीत. नाव नोंदणी झाली नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही. इतकंच काय तर आधारकार्डसोबत लिंक्ड असलेला मोबाईल नंबर सक्रिय असणं गरजेचं आहे. कारण आयुष्मान भारत योजनेसाठी नामांकन करताना त्याच नंबरवर ओटीपी पाठवला जाणार आहे. जर मोबाईल नंबर बंद असेल तर त्यावर ओटीपीच येणार नाही आणि नामांकन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे अडचण वाढू नये यासाठी आधारकार्डवरील मोबाईल नंबर वेळीच बदलून घेणं गरजेचं आहे. आधार कार्ड असेल आणि मोबाईल नंबरही सक्रीय असेल तर नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

आयुष्मान भारत योजनेत पाच लाखांचा लाभ, पण…

आयुष्मान भारत योजनेंतर्गत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळेल. पण पाच लाखांचा लाभ हा वाटून मिळणार आहे. सहज सोप्या शब्दात सांगायचं तर वर्षाला 5 लाख रुपयांचं कव्हर मिळेल. तुमच्या घरात 70 वयापेक्षा दोन किंवा तीन जणं असतील. तर ही रक्कम या दोन किंवा तिघांमध्ये वाटून मिळेल. म्हणजेच प्रत्येकाला वेगळी अशी पाच लाखांचं कव्हर मिळणार नाही. घरातील 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकाने आयुष्मान योजनेत नोंदणी केली असेल. तर इतर 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नागरिक याच कार्डमध्ये आपलं नाव समाविष्ट करू शकतात.

आयुष्मान कार्ड कसं बनवायचं?

आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी https://nha.gov.in/PM-JAY या अधिकृत वेबसाईटवर जा. येथे तुम्हाला PMJAY For 70+ हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करून Enroll For PMJAY For 70+ वर जा आणि नाव नोंदणी करा. लाभार्थी स्वत: या योजनेसाठी नाव नोंदणी करत असेल तर त्याने लाभार्थी (Beneficiary) हा पर्याय निवडावा. तसेच आवश्यक असलेले सर्व नोंदी कराव्यात. मोबईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करावं. जर कुटुंबातील दुसरा सदस्य आपल्या घरातील वृद्ध व्यक्तीची नोंदणी करत असेल तर त्याला ऑपरेटर ( Beneficiary ऐवजी Operator) हा पर्याय निवडावा लागेल. त्याला फॅमिली आयडी, आधारकार्ड इत्यादी माहिती समाविष्ठ करावी लागेल. तसेच ई-केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाली की आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता आणि प्रिंटही काढू शकता.

मोबाईल एपवरून आयुष्मान भारत योजनेत नाव नोंदवू शकता. यासाठी Ayushman App इंस्टॉल करा. डाउनलोड होताच Select Language करा. त्यानंतर Beneficiary की Operator पर्याय निवडून मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून लॉग इन करा. यानंतर फॅमिली आयडी, आधारकार्डची माहिती नोंदवा आणि ई-केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.