Chia Seeds Sideeffects: चिया सिड्सचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक…! होतील ‘हे’ गंभीर आजार

| Updated on: Jan 12, 2025 | 8:29 PM

Sideeffects of Chia Seeds: आजकाल अनेकजण वजन कमी करण्यासाठी त्यांच्या आहारात चिया सिड्सचा समावेश करतात. चिया सिड्सचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. परंतु, जास्त प्रमाणात चिया सिड्सचे सेवन केल्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

Chia Seeds Sideeffects: चिया सिड्सचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक...! होतील हे गंभीर आजार
chia seeds
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

आजकालच्या चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाच्या समस्या होतात. लठ्ठपणाच्या समस्येमुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात. वढलेलं वजन अनेकांच्या त्रासाचे कारण बनले आहे. जास्त वजन वाढल्यामुळे आणि लठ्ठपणामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात त्यामुळे वेळेत तुमचे वजन नियंत्रित करणे गरजेचे असते. वजन कमी करण्यासाठी योग्य आणि पोषक आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटिन आणि कार्बोहायड्रेट्स या घटकांचा समावेश करतात.

अशा परिस्थितीत, अनेकलोक वजन कमी करण्यासाठी त्यांच्या आहारात चिया सिड्सचा समावेश करतात. गेल्या काही काळापासून चिया सिड्स वजन कमी करण्यासाठी लोकांची पहिली पसंती आहेत. चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर, ओमेगा -3 आणि प्राथिने आहेत ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. परंतु कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर परिणाम होऊ शकतो.

जास्त प्रमाणात चिया सिड्सचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेकजण त्यांच्या सकाळची सुरुवात चिया सिड्सच्या सेवनाने करतात. जास्त प्रमाणात चिया सिड्सचे सेवन केल्यामुळे तुम्हाला रक्तदाबाच्या समस्या उद्भवू शकतात. चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही चिया सिड्सचे सेवन करू नये. चिया बिया तुमच्या शरीरातील रक्त पातळ करण्याचे काम करते. चिया सिड्समधील ओमेगा-३ फॅटी ॲसिड तुमच्या शरीरातील रक्तपातळ होऊ लागते. अशा परिस्थितीमध्ये जास्त प्रमाणात चिया सिड्सचे सेवन करू नये. जास्त प्रमाणात चिया सिड्सचे सेवन केल्यामुळे तुम्हाला पचना संबंधीत समस्या होऊ शकतात. चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतात ज्यामुळे तुमचे पचन सुधारण्यास मदत होते. जास्त प्रमाणात चिया सिड्सचे सेवन केल्यामुळे तुम्हाला पोटामध्ये सूज येणे, पोटामध्ये गॅस आणि बद्धकोष्ठता होणे अशा समस्या देखील उद्भवू शकतात.

जास्त प्रमाणात चिया सिड्सचे सेवन केल्यामुळे तुम्हाला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ब्लॉकेजचा धोका वाढू शकतो. चिया सिड्समधील फायबरमुळे हा गंभीर आजार होऊ शकतो. चिया सिड्स पाण्यात टाकल्यामुळे त्या बिया फुगतात ज्यामुळे पचनासंबंधीत समस्या होऊ शकतात. त्यामुळे भिजवलेल्या चिया सिड्सचे सेवन टाळावेत. चिया सिड्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे अनेकांना श्वासाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळ जास्त प्रमाणात चिया सिड्सचे सेवन करणं टाळावे.