मुंबई, तुम्ही कधी उन्हाळ्यात कलिंगडावर मीठ (Extra Salt) घालून किंवा पेरूवर चाट मसाला घालून खाल्ले आहे का? खरबूजात साखर घालून त्याचा आस्वाद घेतला आहे का? अनेकदा लोक ताजी फळे (freshly cut fruits) कापून खातात किंवा त्यांचे सॅलॅड बनवतात. फ्रुट सॅलॅड बनवण्यासाठी लोकं कापलेल्या फळांवर चाट मसाला किंवा मीठ भुरभुरवतात. यामुळे फळाची चव वाढते. घरी असताना कांदा, काकडी वगैरेही कापून त्याचे सॅलॅड बनवून त्यात मीठ (Salt) घालून घेतले जाते. अनेक वेळा लोक कापलेल्या फळांमध्ये साखर घालून फळांचा गोडवा आणखी वाढतो. जर तुम्हालाही चिरलेल्या फळांवर साखर, मीठ किंवा चाट मसाला घालून खायला आवडत असतील तर सावध व्हा. अशा पद्धतीने फळांचे सेवन करणे हे तुमच्या आरोग्यासाठी (harmful) हानिकारक ठरू शकते. फळांचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया, जेणेकरून आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कापलेल्या फळांवर मीठ घातल्यास फळांमधून रस पाझरू लागतो. यामुळे फळांमध्ये असलेली पोषक तत्वं संपुष्टात येतात. तसेच मीठ किंवा चाट मसाला यामध्ये असलेल्या सोडिअमचा किडनीवर परिणाम होतो. जर तुम्ही मीठ आणि चाट मसाला या दोन्हीचे सेवन केले कर शरीरात सोडिअमचे प्रमाण वाढते, कारण चाट मसाल्यामध्येही मीठ असतेच.
प्रत्येक फळामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. तसेच त्यामध्ये ग्लूकोजही असते, ज्यामुळे कॅलरीज वाढतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही कापलेल्या फळांमध्ये आणखी साखर घातली तर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. अतिरिक्त साखरेमुळे वजनही वाढू शकते. ज्या व्यक्ती मधुमेहग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी फळांवर साखर घालून सेवन करणे नुकसानकारक ठरू शकते.
फळं खाण्याची एक योग्य पद्धत आहे. बऱ्याच वेळेल लोक फळांचे सॅलॅड बनवून खातात. भारतीय जेवणात कार्ब्स आणि कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. मात्र आपण जेव्हा जेवणासाह फळांचेही सेवन करतो तेव्हा कार्ब्स आणि कॅलरीज आणखीन वाढतात. अशा परिस्थितीत जेवणातील कार्ब्सचे प्रमाम कमी करून फळं खाऊ शकतो. अन्यथा जेवण आणि फळं एकत्र खाऊ नयेत.