पोटावरची चरबी
Image Credit source: Social Media
मुंबई, धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे आव्हानात्मक असते. कामाचे ओझे आणि जबाबदाऱ्यांमुळे आपल्या फिटनेसची काळजी घेण्यात अडचणी निर्माण होतात. विशेषतः बैठे काम करणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाचे (obasity) प्रमाण जास्त असते. वाढलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसतं. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय विकाराचा धोका देखील वाढतो. वाढलेले पोट कमी करण्यासाठी (Tummy Fat) काही लोकं आहारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याचा फारसा परिमाण होत नाही. मात्र खुर्चीवर बसून पोटाची चरबी कमी करता आली तर?
आज आपण काही सोप्या व्यायामाबद्दल जाणून घेणार आहोत. जे तुम्ही खुर्चीवर बसल्या-बसल्या देखील करू शकता.
- व्यायाम क्रमांक 1
या व्यायामाला कॅट काऊ असे म्हणतात. यासाठी थोडेसे पुढे सरकून खुर्चीवर बसा आणि दोन्ही हात पायांवर ठेवा. आता शरीर सरळ आणि खांदे मागे खेचा. छाती पुढे आणा आणि सुमारे 10 मिनिटे हा व्यायाम करा.
- व्यायाम क्रमांक 2 खुर्चीवर बसून तुम्ही ट्विस्ट नावाचा व्यायाम करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला गुडघे उजवीकडे आणि शरीर डावीकडे वाकवावे लागते. शरीर वळवून, शरीराला ताण द्या. हा व्यायाम तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये कुठेही करू शकता.
- व्यायाम क्रमांक 3 आता आम्ही तुम्हाला हँगिंग बॉडी नावाच्या एका व्यायामाविषयी सांगणार आहोत, जो थेट चरबी जाळण्यासाठी उपयुक्त मानला जातो. यामध्ये खुर्चीवर बसून दोन्ही हातांनी खुर्चीचे हँडल धरा. शरीर 90 अंश खाली झुकवा हा व्यायाम दिवसातून दोन ते तीन वेळा किमान 10 मिनिटे करा.