नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या घातक अवतारानं भारतामध्ये एन्ट्री केली आहे. देशातील 6 व्यक्तींच्या नमुन्यांमध्ये नव्या विषाणू आढळून आले आहेत. या सहा व्यक्ती ब्रिटनमधून भारतात परतले होते. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित केलेल्या नमुन्यांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. बंगळुरुच्या NIMHANS मध्ये 3, हैदराबाद येथील CCMB प्रयोगशाळेत 2 आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणून संशोधन संस्थेकडे आलेल्या एका नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा अवतार आढळला आहे. कोरोना विषाणूचा नवा अवतार पहिल्या विषाणूपेक्षा 70 टक्के जादा घातक आहे. (Six UK returnee found Positive with coronavirus new strain in India )
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ब्रिटनमधील नव्या विषाणूचे 6 रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बंगळुरुच्या NIMHANS मध्ये 3, हैदराबाद येथील CCMB प्रयोगशाळेत 2 आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणून संशोधन संस्थेकडे आलेल्या नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. यासर्व 6 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, हे रुग्ण देशातील कोणत्या भागातील आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
ब्रिटनहून एका महिन्यात 33 हजार व्यक्ती भारतात परतल्या आहेत. त्यापैकी 114 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. या सर्व नागरिकांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर टेस्ट कऱण्यात आल्या आहेत. त्यापैकी 114 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. 114 मध्ये 6 व्यक्तींच्या अहवालांमध्ये कोरोनाचा नवा घातक अवतार आढळला आहे.
कोरोना विषाणूचा नवा घातक अवतार ब्रिटनमध्ये समोर आला होता. तेव्हापासून कोरोनाचा नवा अवतार 19 देशांमध्ये पसरला आहे. या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्यामुळे जगामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लंडन आणि साऊथ इंग्लंडमध्ये लॉकडाऊन लावत, ख्रिसमसच्या उत्साहावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. तर, भारतानं यूके आणि मध्य-पूर्वेतून येणाऱ्या विमान वाहतूकीवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे.
कोरोनाच्या SARS-COV-2 नव्या अवताराला “VUI-202012/01” किंवा B.1.1.7, असं म्हटलं गेलं आहे. हा विषाणू पूर्वीच्या विषाणूच्या तुलनेत वेगानं संक्रमित होतो. यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाची तीन प्रमुख लक्षण आढळून आली आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, वास न येणे याचा समावेश आहे.
कोरोना व्हायरसचा नवा अवतार सुस्साट; ब्रिटनमधून थेट ‘या’ 19 देशांमध्ये पोहोचला#coronavirus #newstrainspreads https://t.co/jgRr3lR1Kd
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
संबंधित बातम्या:
कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, काळजी घ्या- आरोग्यमंत्री
विमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन!
(Six UK returnee found Positive with coronavirus new strain in India)