केरळ | 17 सप्टेंबर 2023 : केरळात निपा व्हायरसची सहावी केस सापडली आहे. इंडीयन काऊन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च ( ICMR ) ने म्हटले आहे की निपा व्हायरसचा मृत्यूदर 40 ते 70 टक्के आहे. कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा मृत्यूदर खूपच जादा आहे. कोरोनाचा मृत्यूदर 2-3 टक्के आहे. आयसीएमआरने म्हटले आहे की केरळात नेमका निपा व्हायरस का पसरतोय याचे कारण अजून सापडलेले नाही. दरम्यान केरळमध्ये निपा व्हायरसने आतापर्यंत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.
कोझिकोडमध्ये एका 39 वर्षीय व्यक्तीला या व्हायरसने संक्रमित केल्याचे आढळले आहे. राज्य आरोग्य विभागाने एक्टीव केस वाढून चार झाल्या आहेत. केरळात आतापर्यत एकूण सहा केसेसची नोंदणी झाली आहे. ज्यातील दोघांचा मृ्त्यू झाला आहे. केरळचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ज्या व्यक्तीचा निपाने मृत्यू झाला आहे त्याचे मृतदेह अजूनही कोझिकोड रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवला आहे. केरळ सरकारने संक्रमण रोखण्यासाठी मोठी तयारी केली आहे. कोझिकोड आढळलेल्या ग्रामपंचायतीत क्वारंटाईन झोन म्हणून घोषीत केले आहे.
आयसीएमआरचे डीजी राजीव बहल यांच्या म्हणण्यानूसार त्यांच्याकडे केवळ दहा रुग्णांसाठी मोनोक्लोनल एंटीबॉडी डोस उपलब्ध आहेत. आपल्या शरीरात उपलब्ध असलेल्या एंटीबॉडीला जेव्हा लॅबोरेटरीत तयार केले जाते तेव्हा त्यास मोनोक्लोनल एंटीबॉडीज म्हटले जाते. हे कॅन्सरसहीत अनेक आजाराच्या उपचारासाठी मदतगार झाले आहेत. आम्ही मोनोक्लोनल एंटीबॉडीचे 20 डोस मागविले आहेत. म्हणजे संक्रमणाच्या सुरुवातीलाच ते देता येतील. मोनोक्लोनल एंटीबॉडीच्या परिणामाचे परीक्षण केलेले नाही. केवळ एका फेजचे परीक्षण झाले आहे.
मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॅटगरीतील 15 लोकांचे सॅंपल घेतले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनूसार संक्रमित लोकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 950 लोक सामील आहेत. त्यातील 213 व्यक्ती हायरिस्क कॅटगरीत आहेत. या कॉन्टॅक्ट लीस्टमध्ये 287 आरोग्य अधिकारी देखील सामील आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी गुरुवारी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेला भेट देऊन निपा व्हायरसला रोखण्यासाठी उचलेल्या पावलांची माहीती घेतली आहे. या येथील एक पथक कोझिकोडला पाठविण्यात आले आहे.