चेहऱ्यावर पुरळ (A rash on the face) किंवा मुरूम येणे जरी सामान्य असले तरी पिंपल्स या इंग्रजी नावाने प्रचलीत हे पुरळ-मुरूम खूप वाईट आहे. आपल्या काही वाईट सवयींमुळे (Because of bad habits) पिंपल्सची ही समस्या वाढत जाते. सवयी बदलल्यामुळे पिंपल्सपासून मुक्ती मिळू शकते. अनेकांना मुरूमांची समस्या त्यांच्या किशोरवयापासूनच जाणवते. काही तरुणांच्या चेहऱ्यावर, खांद्यावर आणि पाठीवरही पुरळ येतात. ते काढून टाकण्यासाठी विविध क्रीम-साबणांचा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, काही रोजच्या सवयी या पुरळ आणि मुरुमांसाठी जबाबदार (Responsible for acne) असतात. ज्याला दुरुस्त केल्यास मुरुमांच्या (पिंपल्स) समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते. जाणून घेऊया कोणत्या सवयी मुरुमांसाठी कारणीभूत ठरू शकतात. पहिली सवय म्हणजे, चेहऱयाची स्वच्छता तुम्ही नियमीत चेहरा स्वच्छ ठेवला पाहीजे. दिवसातून, किमान चार वेळा थंड पाण्याने चेहरा साफ करावा.
त्वचेच्या समस्या टाळायच्या असतील तर, स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. दैनंदिन अंघोळीचा टॉवेल स्वच्छ ठेवण्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. जे मुरुमांसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असू शकते. घाणेरडे आणि घामाचे टॉवेल्स मुरुमांचे कारण आहेत. टॉवेल नेहमी धुऊन उन्हात वाळल्यानंतर वापरावा. त्याचवेळी, इतर कोणाचा टॉवेल मुळीच वापरू नका. यामुळे चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात.
आजकाल मास्क घालणे खूप महत्त्वाचे आहे. पण जर तुम्ही मास्क रोज वापरत असाल. त्यामुळे मास्क धुवा आणि उन्हात वाळवा. घाणेरड्या मास्कमुळे पुरळ-मुरूम येण्याची शक्यता असते. दुसरीकडे, जर तुम्ही सर्जिकल मास्क वापरत असाल तर तो एकदाच लावा.
घाणेरडा टॉवेल व्यतिरिक्त, कुबट दर्प येणाऱ्या बेडशीटसह बिछान्या मुळे देखील मुरूम होऊ शकतात. म्हणूनच आठवड्यातून एकदा तुमची उशी आणि चादरी नियमीत धुणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा आपण उशी किंवा पलंगावर चेहरा ठेवतो तेव्हा बेडच्या अस्वच्छतेमुळे आपल्याला पुरळ येतात. बहुतेक लोक याकडे लक्ष देत नाहीत.
तुमचे घाणेरडे केस देखील चेहऱ्यावर पुरळ येण्याचे कारण असू शकतात. आठवड्यातून दोनदा केस धुणे आवश्यक आहे. अन्यथा घाणेरड्या केसांमुळे कपाळावर आणि गालावर पुरळ उठतात.
खाण्यापिण्यात सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही सतत जंक फूड किंवा खूप गोड पदार्थ खात असाल तर चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. जेणेकरून त्वचा चमकदार होते.