कमी उंची + स्थूलपणा = Bad combination ! हे ठरू शकते हार्ट ॲटॅकचे कारण

| Updated on: Mar 10, 2023 | 9:08 AM

प्रत्येक व्यक्तीच्या कंबरेचा आकारा हा त्याच्या उंचीनुसार अससली पहिजे. आता असे आढळून आले आहे की हृदयविकाराचा संबंध उंची आणि वजनाशीही आहे.

कमी उंची + स्थूलपणा = Bad combination ! हे ठरू शकते हार्ट ॲटॅकचे कारण
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : आजकाल हार्ट ॲटॅक आणि एकंदरच हृदयविकाराचे (heart disease) प्रमाण खूप वाढले आहे. गेल्या काही वर्षांत हार्ट ॲटॅकमुळे अनेकांनी प्राण गमावले आहेत. प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक (satish kaushik) यांचा हार्ट ॲटॅकमुळे नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला. तर बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका (heart attack)आला होता. सुदैवाने तिच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने तिचा जीव वाचला. पण एवढेच नव्हे तर गायक केके, विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, दिग्दर्शक राज कौशल यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हार्ट ॲटॅकमुळे त्यांचा जीव गमावला.

ही तर झाली सेलिब्रिटींची गोष्ट पण जगभरात आजच्या काळात लाखो लोकांना हृदयविकाराचा सामना करावा लागत आहे. त्यात काहींचा मृत्यूही झाला. एकंदरच हार्ट ॲटॅकचे प्रमाण वाढले आहे.

याला कारणीभूत आहे आपली जीवनशैली. नीट खायचं-प्यायचं नाही, रात्री उशीरा झोपायचं, व्यायाम व शारीरिक हालचाल शून्य, सतत बसून काम करायचं, या सगळ्यामुळे आयुष्य बिघडत चाललय. लोकांचे वजन वाढत आहे, लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे व त्यामुळे अनेक शारीरिक व्याधीही समोर येत आहेत. याच सदंर्भात एक संशोधन समोर आलं आहे. त्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे आकारमान जास्त असेल तर त्याला हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. यासोबतच हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो. म्हणजेच लठ्ठपणा आणि हृदयविकार यांचा जवळचा संबंध आहे. इंग्लंडमधील वोल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, कोणत्याही व्यक्तीच्या कंबरेचा आकार किंवा साईज ही त्यांच्या उंचीनुसार असावा. संशोधन पथकाचे प्रमुख प्रोफेसर ॲलन नेव्हिल यांच्या मते, आतापर्यंत बॉडी मास इंडेक्स हे निरोगी शरीराचे मोजमाप मानले जात होते, परंतु आता असे आढळून आले आहे की हृदयविकाराचा संबंध त्या व्यक्तीची उंची आणि वजन किती आहे, याच्याशी देखील आहे. या संशोधनात असे म्हटले आहे की शरीरात अतिरिक्त चरबी ्सेल तर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामध्ये कंबरेवरील चरबीमुळे रोगाचा धोका जास्त असतो.

संशोधनात काही पॅरामीटर्स म्हणजेच मापदंडही जाहीर करण्यात आले आहेत. त्यात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीची उंची 5 फूट असेल तर त्याच्या कंबरेचा आकार 35.25 इंच इतका असावा. तर 6 फूट उंच असलेल्या व्यक्तीच्या कंबरेचा आकार 38.5 इंचापर्यंत असावा.