सोडियमच्या कमतरतेमुळे देखील जडू शकतात गंभीर आजार, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

| Updated on: Sep 18, 2022 | 6:42 PM

मिठाच्या सेवनाबाबत कायमच वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात, मात्र त्याच्या कमतरतेबद्दल सहसा बोलले जात नाही. जाणून घेऊया शरीरात सोडियमचे महत्त्व

सोडियमच्या कमतरतेमुळे देखील जडू शकतात गंभीर आजार, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
सोडियम
Image Credit source: Social Media
Follow us on

बऱ्याचदा आपण जास्त मीठ खाल्ल्याने होणाऱ्या आजारांबद्दलचर्चा करतो, मात्र तुम्हाला हे माहिती आहे काय? शरीरात मीठ किंवा सोडियम कमी होणे (Deficiency of sodium) हे देखील धोक्याचे आहे. शरीरात सोडियम कमी झाल्यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. जेव्हा शरीरातील द्रवपदार्थाचे प्रमाण खूप जास्त किंवा खूप कमी होते, तेव्हा रक्तातील सोडियमचे प्रमाण खूप कमी होते. त्याचा मेंदूवर  खूप वाईट परिणाम होतो. रक्तातील सोडियम शरीरात विद्युत संचलन करण्यास मदत करते, ज्यामुळे आपण कोणतेही काम योग्य प्रकारे करू शकतो. सोडियम हे इलेक्ट्रोलाइट आहे जे शरीराच्या प्रत्येक पेशीमधील पाण्याचे नियमन करते.

सोडियमच्या कमतरतेला वैद्यकीय भाषेत हायपोनेट्रेमिया असेही म्हणतात. सोडियम नियमित रक्तदाब राखण्यास मदत करते. हे शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करते तसेच स्नायू आणि नसा सक्रिय करण्यास मदत करते. प्रौढ व्यक्तीमध्ये सोडियमची पातळी 135 ते 145 mEq/L दरम्यान असावी.

सोडियमच्या कमतरतेमुळे काय होते

जेव्हा रक्तामध्ये सोडियमची कमतरता असते तेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू लागते आणि त्यामुळे शरीरावर सूज येते. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

हे सुद्धा वाचा

इतकेच काय तर जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. सोडियमच्या तीव्र कमतरतेमुळे, एखादी व्यक्ती कोमामध्ये देखील जाऊ शकते.

याचा मेंदूवर सर्वाधिक परिणाम होतो कारण मेंदूला सूज आल्याने स्मरणशक्ती कमी होते तसेच इतर मानसिक आजार देखील जडण्याची शक्यता निर्माण होते.

 काय आहे लक्षण

शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळे मेंदू कमजोर होऊ लागतो. डोकेदुखीची समस्या सतत भेडसावते. मनात अनेकदा गोंधळ असतो. याशिवाय शरीरात थकवा येतो. सोडियमच्या कमतरतेमुळे व्यक्तीला थकवा आणि सुस्तपणा जाणवू लागतो.

चिडचिड आणि विस्मरण सारख्या समस्या देखील निर्माण होतात. रक्तातील सोडियमच्या कमतरतेमुळे, अस्वस्थता जाणवते. सोडियम स्नायूंना सक्रिय करते परंतु त्याच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात.

स्नायू दुखू लागतात. सोडियमच्या कमतरतेमुळे पोटाचा त्रास होतो. त्यामुळे मळमळ, उलट्या आणि पोटदुखीची तक्रार जाणवते. गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्ण बेशुद्ध देखील होऊ शकतो.

अशी भरून काढा सोडियमची कमतरता

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, प्रौढ व्यक्तीला दररोज 5 ग्रॅम मीठ आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये 2 ग्रॅम सोडियम असावे. कमी-अधिक दोन्ही धोकादायक आहेत. अतिसेवनामुळे उच्च रक्तदाबाचा आजार होतो.

कमी खाल्ल्याने मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. वरील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑस्मोलालिटी रक्त तपासणी व लघवीची तपासणी करून घ्यावी.

कमतरता असल्यास मीठाचे सेवन करावे. बेशुद्धावस्थेत डॉक्टर रुग्णाला सोडियम कंपाऊंड ड्रिपद्वारे देतात, ज्यामुळे मीठाची कमतरता पूर्ण होते.