सॉफ्ट ड्रिंकच्या सेवनाने वाढते पुरुषांची ‘ती’ क्षमता.. वाचा संशोधन काय सांगतं?

| Updated on: Mar 13, 2023 | 2:48 PM

चीनच्या नॉर्थवेस्ट मिंजी युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी संशोधनाद्वारे असा दावा केला आहे की कार्बोनेटेड शीतपेयांच्या उच्च डोसमुळे पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढू शकते.

सॉफ्ट ड्रिंकच्या सेवनाने वाढते पुरुषांची ती क्षमता.. वाचा संशोधन काय सांगतं?
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : तुम्हालाही सॉफ्ट ड्रिंक प्यायचे (soft drinks) व्यसन आहे का? ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एका मुलाखतीत त्यांना कोकचे व्यसन असल्याचे मान्य केले आहे. मेक्सिकन कोक हे त्यांचे आवडते पेय आहे. आता तुम्ही विचार करत असाल की आपण येथे ऋषी सुनक आणि शीतपेयांबद्दल का बोलत आहोत ? तर हे जरूर वाचा… सॉफ्ट ड्रिंक्स ही पुरुषांसाठी (men) फायदेशीर आहेत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. कोक आणि पेप्सी सारख्या सर्व कार्बोनेटेड शीतपेयांमुळे होणारे नुकसान, याबद्दल तुम्ही बरचं काही वाचलं असेल, पण या नव्या अभ्यासातून (research) अगदी उलट माहिती समोर आली आहे.

सॉफ्ट ड्रिंक्स कशी फायदेशीर आहेत ?

हे सुद्धा वाचा

चीनच्या नॉर्थवेस्ट मिंजी युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की कोका-कोला आणि पेप्सी सारख्या कार्बोनेटेड शीतपेयांचा उच्च डोस पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि अंडकोषाचा (टेस्टिकल) आकार वाढवू शकतो. संशोधकांनी 15 दिवसांच्या कालावधीत नर उंदरांच्या गटांवर याची चाचणी केली. या काळात उंदरांच्या एका गटाला फक्त पाणी प्यायला दिले जात होते, तर दुसऱ्या गटाला कोक आणि पेप्सी वेगवेगळ्या प्रमाणात पिण्यास दिले जात होते.

धक्कादायक निष्कर्ष आला समोर

या संशोधनाद्वारे एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. संशोधनानुसार, 15 दिवस सॉफ्ट ड्रिंक्स अथवा शीतपेय पिणाऱ्या उंदरांच्या अंडकोषांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पेप्सी-कोक प्यायल्यानंतर सर्व उंदरांमध्ये सीरम टेस्टोस्टेरॉन एकाग्रता वाढली, ज्यावरून असे दिसून आले की सॉफ्ट ड्रिंकचा उच्च डोस नर उंदरांमध्ये टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन वाढवू शकतो.

कॅफिन ठरते का कारणीभूत ?

सॉफ्ट ड्रिंक्समुळे पुरुषांचे टेस्टिकल्स कसे वाढू शकतात याचा कोणताही ठोस पुरावा शास्त्रज्ञांकडे नाही. परंतु मागील काही अभ्यासांनुसार, हे उघड झाले आहे की जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवू शकते, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या वाढते. यापूर्वी 2500 पुरुषांवर एक संशोधन करण्यात आले होते, ज्यामध्ये असे समोर आले होते की, दररोज सुमारे 1 लिटर कार्बोनेटेड पेय प्यायल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या 30 टक्क्यांनी कमी होते.

यापूर्वी काही संशोधनांमध्ये असे आढळले होते की सॉफ्ट ड्रिंकमध्ये असलेली अति साखर ही आपल्या आरोग्यासाठी तसेच दातांसाठीही खूप हानिकारक असते. त्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो.