जर तुम्हाला सुद्धा सॉफ्ट ड्रिंक(Soft Drink) पिण्याची आवड असेल तर आत्ताच सावध व्हा.या सॉफ्ट ड्रिंक मध्ये वापरण्यात येणारे आर्टिफिशियल स्वीटनर (Artificial Sweeteners) मुळे भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका अधिकच असतो, असे नुकतेच संशोधना अंती सिद्ध झालेले आहे. हा दावा फ्रान्स मधील वैज्ञानिकांनी केलेला आहे.या वैज्ञानिकांनी 1 लाख लोकांवर एक संशोधन केले. हे संशोधन गेल्या 8 वर्षापासून सुरू आहे. या संशोधनाच्या अंती जे निष्कर्ष आले ते थक्क करणारे होते. या संशोधनामध्ये असे आढळून आले की, जे लोक सॉफ्ट ड्रिंक पितात त्या सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये जे आर्टिफिशियल स्वीटनर मिसळलेले असतात, ज्यामुळे मनुष्याच्या शरीरात कॅन्सर (Cancer) होण्याची शक्यता 13 टक्के अधिक असतो. हे संशोधन नेशनल इंस्टीट्यूट फॉर हेल्थ एंड मेडिकल रिसर्च च्या वैज्ञानिकांनी केले. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, अधिक तर सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये एस्पारटेम आणि एससल्फेम-के ऑर्टिफिशियल स्वीटनर्स चा वापर केला जातो. हे पदार्थ भविष्यात कॅन्सरला आमंत्रण देणारे ठरतात.
रिपोर्टनुसार रिसर्च पूर्ण होण्या दरम्यान 3,358 लोकांना कॅन्सर झाला,यातील 982 लोक ब्रेस्ट कॅन्सरने पीडित होते तर 403 लोकांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. 2032 लोकांना अतिलठ्ठपणामुळे कॅन्सर सारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे,असे देखील निष्कर्ष या रिसर्च दरम्यान समोर आले.
रिसर्च रिपोर्टनुसार ज्या लोकांच्या ड्रिंक मध्ये 79 एमजी पेक्षा जास्त आर्टिफिशियल असते त्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचा धोका 13 टक्के अधिक दिसून येतो. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या ड्रिंक्स मध्ये एस्पारटेम आणि एससल्फेम-के सारखे ऑर्टिफिशियल स्वीटनर्स सर्वसामान्यांना शुगरच्या तुलनेत 20 टक्के जास्त गोडवा आपल्या शरीरामध्ये तयार करतात यामुळे भविष्यात आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. तसे पाहायला गेले तर केलेल्या संशोधनावर दुसर्या वैज्ञानिकांनी सुद्धा आपली बाजू मांडली आहे. कॅन्सर रिसर्च युके येथील सिनियर हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजर फियोना ऑस्गुन यांच्या मते, वैज्ञानिकांनी आर्टिफिशियल स्वीटनर आणि कॅन्सर यांच्यातील असतानी नातेसंबंध या संशोधनामध्ये दर्शवलेले आहे परंतु याचा अर्थ असा नाही की, यामुळे तुम्हाला भविष्यात कॅन्सर होऊ शकतो परंतु नागरिकांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. कोणतीही गोष्ट जर आपण अतिरिक्त सेवन केली तर त्याचा भविष्यात दुष्परिणाम होऊ शकतो म्हणूनच जर तुम्ही भविष्यात सॉफ्ट ड्रिंक वारंवार सेवन करत असाल तर याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर अवश्य होऊ शकतो म्हणूनच शक्यतो सॉफ्ट ड्रिंक कमी सेवन करण्याचा प्रयत्न करा.
Petrol Diesel नंतर आता आणखी एक फटका! पॅरासिटेमॉलसह 800 औषधं महागणार, असं नेमकं का होणार?