हिवाळ्यात (Winter) सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या (Green leafy vegetables) खाव्यात असा सल्ला जवळपास सर्वच आहारतज्ज्ञ (Dietitian)देतात. हिरव्या पालेभाज्या या विविध पोषण तत्वे आणि व्हिटॅमिनचा स्त्रोत असतात. पालेभाज्याच्या सेवनाने तुमच्या शरीराला मोठ्याप्रमाणात पोषण तत्वे मिळताच. तसेच व्हिटॅमिनची कमतरता देखील दूर होते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्यांचे सेवन केल्यास इम्युनिटी वाढण्यास देखील मदत होते. कोरोना काळात तर पालेभाज्याचे सेवन अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी, चुका, शेपू, पालक अशा विविध भाज्यांचा समावेश होतो. यापैकी एक असलेल्या पालकाच्या सेवनाचे फायदे तसेच कोणत्या व्यक्तींनी पालक खाणे टाळावे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. पालकाला सुपरफूड असे म्हटले जाते. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. आजारी मानसाला पालक खायला दिल्यास तो लवकर रिकव्हर होण्यास मदत होते.
पालकाला सुपरफूड म्हटले जाते, त्याची अनेक कारणे आहेत. पालकामध्ये कॅलरीज कमी असून, मोठ्याप्रमाणात पोषण तत्वाचा साठा आहे. पालकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोहसोबतच व्हिटॅमिन ए आणि सी आढळून येते. तुम्ही जर तुमच्या आहार नियमितपणे पालकाचा समावेश केला तुमचे कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण होते. रक्तातील सखारेचे प्रमाण नियंत्रित राहाते. पालकाच्या नियमित सेवनाने वजन देखील कमी होते. तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाणा वाढते. पालकाचे नियमित सेवन केल्यास मधुमेहासारखी समस्या देखील दूर होते.
मात्र जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र पालकाचे सेवन न करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. पालकामध्ये ऑक्सॅलिक ऍसिडसह प्युरिन, (एक प्रकारचे कंपाऊंड) देखील भरपूर असते. ही दोन संयुगे एकत्रितपणे संधिवात उत्तेजित करू शकातात. त्यामुळे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी पालकाचे सेवन करणे टाळावे. तसेच तुम्ही जर एखाद्या आजारामुळे रक्त पातळ करण्याची औषधे घेत असाल तर पालकाचे सेवन टाळावे.
टीप : वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानाच्या हेतून देण्यात आली आहे. तुमचा डायट प्लॅन ठरवण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.
Bathing Tips : अंघोळ करताना या चुका टाळा, तुमच्या आरोग्यासाठी ठरु शकते हानिकारक
दरवर्षी डासांमुळे लाखांवर मृत्यू, तरीही शास्त्रज्ञ डासांना वाचवतात! जर डासच नसतील तर काय होईल?